क्रांती दिनी प्रहार काढणार दिड लाखांचा मोर्चा, पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांची माहिती...!
प्रहार काढणार शहरात दिव्यांगांच्या प्रश्नांवर भव्य मोर्चा...!
आता महायुतीसोबत मुद्द्यांवर होईल जागावाटपाची चर्चा, माध्यमे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत नसल्याने व्यक्त केली नाराजी...विशालगडाच्या हिंसक घटना करणा-यांना शिक्षा झाली पाहिजे, धार्मिक स्थळाची नासधूस केली हे महाराष्ट्राला न शोभणारी घटना, छत्रपतींनी रयतेसाठी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन राज्य केले मस्जिद पण बांधली पण त्याला इजा पोहचवली नाही....गडांचे संवर्धन झाले पाहिजे पण अशा हिंसा करून नाही...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज) शासनाच्या योजना गरीब श्रीमंतांमध्ये दरी निर्माण करणा-या ठरत आहे. जे कष्ट करत नाही त्यांना जास्त जे कष्ट करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिव्यांग, दिन दलित, गरीब व शेतकरी मजूरांकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून दिव्यांग, निराधार व शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी प्रहारच्या वतीने क्रांतीचौकातून दुपारी दोन वाजता एक ते दिड लाखांचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मागणी 15 दिवसांत पूर्ण झाली नाही तर अधिका-यांना प्रहारच्या स्टाईलने जाब विचारला जाईल. शहरी भागात राहणाऱ्यांना घरकुलाचे अडिच लाख तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सव्वा लाख रुपये अशी तफावत का...? जे दिव्यांग आहे त्यांना हजार रुपये महीना तर जे नाही त्यांना त्याहून जास्त. मतांसाठी योजना काढत असतील त्याला विरोध नाही परंतु आर्थिक विषमता कशाला निर्माण करत आहे. हि तयारी विधानसभेची आहे. महायुतीत जागा वाटप बंद दाराआड होते आता प्रहार जागावाटप मुद्द्यांवर करणार आहे. महायुती सरकारने दिव्यांगांचे, निराधार, शेतकरी शेतमजूर या सर्वांचे सर्व प्रश्न सोडवले तर मी निवडणूक लढणार नाही उलट भाजपाचा प्रचार करणार. आमची ताकत जेथे आहे तेथे स्वबळावर निवडणूक लढणार. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रहार पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
त्यांनी विशाळगडाच्या घटनेवर संताप व्यक्त केला. विशालगडाच्या खाली जी हिंसक घटना घडली धार्मिक स्थळाची तोडफोड केली त्या घटनेचा निषेध करतो. छत्रपतींनी रयतेचे राज्य स्थापन केले सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेतले. मुस्लिम समाजासाठी मस्जिद बांधली पण त्याची नासधूस केली नाही. त्यांच्या सोबत मुस्लिम सैनिक पण होते. ज्यांनी मस्जिदला क्षती पोहचावली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. गडाचे पण संवर्धन झाले पाहिजे. महाराष्ट्रातील संस्कृती आहे गडाचे संवर्धन करण्याचे पण हिंसा करून हे केले जात असेल तर मी त्यांची निंदा करतो.
यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी, मराठवाड्याचे अध्यक्ष जे.के.जाधव, कुणाल राऊत उपस्थित होते.
What's Your Reaction?