जिल्ह्यात मनाई आदेश लागू
मनाई आदेश लागू
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) अगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दि.१५ एप्रिल पर्यंय्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. त्याअन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाहक स्फोटक पदार्थ बाळगणे, पाच किंवा अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पूर्वपरवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक ग्रामिण यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील,असेही अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी स्पष्ट केले आहे
What's Your Reaction?