दर्पण दिन पत्रकारांचे आरोग्य शिबीर घेऊन साजरा

दर्पण दिन पत्रकारांचे आरोग्य शिबीर घेऊन साजरा....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)
दर्पण दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तर्फे आयोजित नूर हॉस्पिटल बायजीपुरा औरंगाबाद येथे पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास 55 पत्रकार व त्यांच्या परिवारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, जेष्ठ समाजसेवक साजिद मौलाना , ज्येष्ठ पत्रकार आर. जी. देशमुख, दैनिक सकाळचे अनिल कुमार जमधडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय संघटक दैनिक पुण्यनगरीचे परवेज खान, शेखलाल शेख, सुरेश शिरसागर, ज्येष्ठ पत्रकार शेख मजहर, एम. ए. शकील, शेख शफीक, तौफिक शहेबाज, सुजित ताजने, संजय हिंगोलीकर, बाजीराव सोनवणे, के. एम. आय. सय्यद, मिर्झा शफी बेग, पत्रकार तथा एड सय्यद मोईन, सय्यद नदीम सौदागर, दिशा सुरवसे पाटील, सय्यद करीम, साजिद पटेल आयोजक व्हॉईस ऑफ मीडिया सा.
विंग प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम व जिल्हाध्यक्ष साप्ताहिक विंग डॉ शकील शेख हे होते.
डॉक्टर शकील शेख व महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे या आरोग्य शिबिरात सहकार्य लाभ
ले.
What's Your Reaction?






