पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य...
पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य...
प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.14(डि-24 न्यूज)- भारत सरकारच्या पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था (सिपेट) यांच्यावतीने प्लास्टीक प्रोसेसिंग मशिन ऑपरेटर हा चार महिने कालावधीचा विनामूल्य अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या अभ्यासक्रमास इच्छुकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हा अभ्यासक्रम पूर्णतः निःशुल्क असून राज्यातील रहिवासी असलेल्या 18 ते 30 वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय , आर्थिक मागासलेल्या गटातील युवक युवतींसाठी हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम विनामूल्य आहे. या अभ्यासक्रमाच्या 55 जागा असून 10 वी उत्तीर्ण किंवा त्याच क्षेत्रातील अनुभव असलेल्या इयत्ता 8 वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवारही अर्ज करु शकतील.अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर आहे. प्रवेश प्रक्रिया दि.24 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. अधिक माहितीसाठी 9325687910/ 960136455/9145675585 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक सिपेट, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
What's Your Reaction?