बुधवारी खाण पट्टा धारकांची बैठक घेणार जिल्हाधिकारी

खाणपट्टाधारकांची बुधवारी (दि.6) बैठक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- कृत्रिम वाळू धोरण अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भात कार्यपद्धती व अन्य अनुषंगिक माहिती देण्यासाठी बुधवार दि.6 रोजी दु.३ वा. खाणपट्टाधारक, क्रशरधारकांची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक होणार असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.
What's Your Reaction?






