भरपावसात लाडक्या भावाचा हजारो बहिणीसोबत साधला संवाद...!

 0
भरपावसात लाडक्या भावाचा हजारो बहिणीसोबत साधला संवाद...!

भरपावसात लाडक्या भावाचा बहिणीसोबत साधला संवाद...

लाडक्या बहिणीचा देवाभाऊ कार्यक्रमाला हजारो बहिणीची उपस्थिती

छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) रक्षा बंधनाच्या पूर्व संध्येला राज्यातील बहिणीच्या खात्यावर तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाच हजार पेक्षा अधिक बहिणींचा सन्मान करत भरपावसात त्यांच्या सोबत संवाद साधला. 

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षा बंधनाच्या पूर्व संध्येला 1 कोटी 8 लाख बहिणींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार देखील टाकण्यात आले. या योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणी साठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी लाडक्या बहिणीचा सन्मान करण्यासाठी लाडका बहिणीचा देवाभाऊ हा कार्यक्रम हनुमान चौकातील वंजारी भवन समोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरून राज्याने हजेरी लावली, मात्र आलेल्या बहिणी उठून न जाता त्यांनी डोक्यावर खुर्ची घेत आपल्या भावासोबत संवाद साधण्यासाठी खंबीर पणे उभ्या होत्या.

यावेळी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे, खा. डॉ.भागवत कराड, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केनेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, जालिंदर शेंडगे, हर्षवर्धन कराड, दीपक ढाकणे, गोविंद केंद्रे, रामेश्वर भादवे, विवेक राठोड, नितीन खरात, रामचंद्र जाधव, यांच्या सह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकाने निर्णायक निर्णय घेऊन महिला सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे. आपल्या जिल्ह्यात एकूण 5 लाख 42 हजार 754 अर्ज प्राप्त झालेले असून यातील अर्जाची पडताळणी करून 5 लाख 34 हजार 310 अर्ज प्राप्त ठरविण्यात आले असल्याचं मंत्री श्री अतुल सावे यांनी सांगितले. उर्वरित अर्जाची त्रुटी पूर्तता करून तत्काळ त्या बहिणींना लाभ देण्यात येईल. 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, हा भाऊ कायम बहिणीच्या संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असेल, महिलांना सर्वतोपरी लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजप तर्फे रविवारी लाडक्या बहिणीचा देवाभाऊ कार्यक्रमांत आलेल्या महिलांनी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे, खा.भागवत कराड, शिरीष बोराळकर, संजय कणेकर यांना राखी बांधत आनंद

साजरा केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow