मराठा आंदोलक अक्रामक, खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे राजीनामा देण्याची मागणी

 0
मराठा आंदोलक अक्रामक, खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे राजीनामा देण्याची मागणी

मराठा आंदोलक अक्रामक, खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी भेट घेऊन केली राजीनामा देण्याची मागणी

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत आहे. आज दुपारी मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी खासदार इम्तियाज जलील यांचे निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहोचले. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना आपण खासदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी निवेदन सादर केले. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना सांगितले मराठा आरक्षणाला आमदार असताना माझा पाठिंबा आहे. विधानसभेत त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता. मी खासदार पदाचा राजीनामा दिला तर संसदेत प्रश्न कसे उपस्थित करणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी माझी भुमिका आहे. आंदोलन शांतपणे करावे. हिंसक आंदोलन करु नका, युवकांनी आपल्या कुटुंबाकडे बघावे आत्महत्या करु नये असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले.

आंदोलक खासदार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यामुळे एसिपि संपत शिंदे, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष पाटील, एपिआय चावरे यांनी खासदारांची भेट घेतली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow