मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाच्या सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
 
                                मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाच्या सर्वेक्षणास 2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
औरंगाबाद,दि.31(डि-24 न्यूज) महाराष्ट्रातील मराठा व समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण दि.31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. काही ठिकाणी सर्वेक्षण दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होऊ शकत नसल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निर्दर्शनास आले आहे. यामुळे सर्वेक्षणास दि.2 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम दि.2 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे काम प्रगणकांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            