महागाई विरोधात शिवसेनेचा एल्गार, क्रांतीचौकात केले जन आक्रोश आंदोलन...
महागाईविरोधात शिवसेनेचा एल्गार; क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, दि.7(डि-24 न्यूज)- वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या फसव्या कर्जमाफी विरोधात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवार, 7 जून रोजी क्रांती चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली हे आंदोलन संपन्न झाले.
सर्वप्रथम शिवसैनिकांनी सायकलवरून प्रतीकात्मक फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढत असलेल्या आर्थिक बोजाकडे सरकारचे लक्ष वेधले. तसेच रिकामे गॅस सिलिंडर आणून घरगुती गॅसच्या दरांविरोधात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बहुत हुई महंगाई की मार, ", "अच्छे दिन नाहीत, महंगे दिन", "महागाई हटवा... मोदी हटवा", "इंधन दरवाढ रद्द करा", "शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, ही तर कर्जवसुली" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे, फलक व बॅनर घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असह्य झाल्याने शिवसैनिकांनी गॅस सिलेंडर उलटा ठेवून त्याची आरती केली. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात ताटे व बेलणे घेऊन सरकारविरोधात बोंब मारत महागाईविरोधात रोष व्यक्त केला. तर अनेक शिवसैनिक टाळ घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांना फसवणारी असून शिवसैनिकांनी हा कर्जमाफीचा शासकीय अध्यादेश जाळला. शिवसैनिकांनी अध्यादेश जाळून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.
महागाईमुळे शेतकरी, कामगार, महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक डबघाईला आले आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशाराही अंबादास दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारला दिला.
महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून फक्त सुषमा वाघ या तरुणीने भूमिका मांडली. वाढती महागाई, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाबाबत सुषमा वाघ हिने अनेक प्रश्न उपस्थित केले. महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून सरकारकडे युवकांच्या भविष्याबाबत कोणतेही ठोस धोरण नाही. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून तरुणांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष युवकांना करावा लागेल असे आवाहन वाघ या तरुणीने केले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सह संपर्कप्रमुख राजेंद्र काळे, जिल्हा संघटक सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, संतोष खेंडके, किशोर कच्छवाह, विठ्ठल बदर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, संजय मोटे, मनोज पेरे, सोमीनाथ करपे, विष्णू जाधव, तालुका संघटक मनोज गायके, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, गोपाल कुलकर्णी, नगरसेवक सचिन खैरे, उपशहरप्रमुख संदेश कवडे, बापू कवडे, मंगेश भाले, गोरख सोनवणे, दिनेश राजे भोसले, नितीन पवार, प्रकाश कमलाणी, सुरेश गायके, सचिन वाघ, सुरेश पवार, दीपक महाडिक, किशोर साबळे, जयसिंग होलिये, योगेश शर्मा, नरेश दैवत्ववाल, सुधीर जाधव, जगदीश वेताळ, गजेंद्र दळवी, पुरुषोत्तम पानपट, शिवाजी ठेंगडे, गणेश सुरे, पृथ्वीराज राठोड, नारायण मते, बाळू गडवे, रवि गायकवाड, किरण सालपे, दीपक तांबे, देविदास रत्नपारखी, रणजीत दाभाडे, भारत ढवळे, सतीश कटकटे, विनोद लोखंडे, नारायण जाधव, शिवकुमार देशमुख, मयूर तुपे, वैजीनाथ म्हस्के, सलीम खामगावकर, कांता टेमकर, रावसाहेब टेके, गोविंद वल्ले, संदीप हिरे, मनोज सोनवणे, शिवाजी आपरे, निवृत्ती पळसकर, विकास गोरडे, प्रल्हाद घुगे, संतोष सांगळे, व्यंकटेश वानखेडे, शिवाजी बचाटे, सुनील कडवे, संजीवन सरोदे, निखिल बारवाल, नितीन भरे, भगवान उंटवाल, सागर बारवाल, ज्ञानेश्वर साठे, मनीष सरोसे, कुणाल पाठक, मदनराव चौधरी, दत्ता उकिरडे, सांडू पाटील मते, बाळू भोसले, सुरेश नाडे, विशाल चौधरी, राजू ठोंबरे, बबनराव वाघ, संदीप कुमावत, सुरज काथार, ज्ञानेश्वर शेळके, प्रतीक अंकुश, मधुकर घोरपडे ,सुंदर साळवे, भाऊसाहेब चव्हाण, विजय दाभाडे, महिला आघाडी महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, दुर्गा भाटी, सुनंदा खरात, छाया देवराज, वंदना कुलकर्णी, राजश्री पगार, रुपाली मुंदडा, सारिका शर्मा, मनीषा ठाकरे, सीमा गवळी, सविता डोंगरे, मनीषा पाटील , विजया पवार, रंजना कोलते, सुष्मा वाघ, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, विठ्ठल डमाळे, अक्षय साठे, रामेश्वर कोरडे, मधुर चव्हाण , अतुल बिडकर, यश पागोरे, श्रीकृष्ण पांचाळ, संभाजी सोनवणे, साईनाथ थोरवे, अविनाश वाघुले ,प्रतीक अंकुश, वरद पठाडे ,चरण शिंदे, करण शिंदे, आस्तिक देवतवाल व देवीदास खरात उपस्थित होते.
What's Your Reaction?