योजनेपासून कोणीच वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा- मंत्री अतुल सावे

 0
योजनेपासून कोणीच वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा- मंत्री अतुल सावे

योजने पासून कोणीच वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा..

मंत्री श्री अतुल सावे यांचे प्रतिपादन

संकल्प यात्रेत साधला नागरिकांशी संवाद

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत कुठलाही व्यक्ती योजने पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत ही योजना घराघरात पोहचवा असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी केले. विश्रांती नगर, भवानी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत प्रसंगी ते बोलत होते.

केंद्र सरकारचे महत्वकांक्षी योजनांचे फायदे तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत' या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरूवात करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आज दिनांक 16 शनिवार रोजी विश्रांती नगर, जय भवानी नगर आणि हडको परिसरात आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारताचे अर्थ राज्यमंत्री डॉ .भागवत कराड, मनपा आयुक्त श्री जी श्रीकांत, श्री अनिल मकरिये, श्री समिर राजूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र जंजाळ, श्री अशोक दामले, श्री बापू घडामोडे, श्री विवेक राठोड, श्री प्रमोद राठोड, श्री राजू वानखेडे, श्री नितीन चित्ते, सागर पाले, सौ.मनीषा मुंडे, श्री दामू अण्णा शिंदे, श्री बालाजी मुंडे, श्री शैलेश हेकडे, श्री शैलेश भिसे, श्री अशोक दामडे, श्री नितीन खरात, श्री अरुण पालवे, श्री लक्ष्मण कुलकर्णी, श्री अशोक जगधने, श्री विक्रम सिंग पवार, सौ. पुष्पा रोजतकर, पूजा सोनवणे, यांच्या सह भाजपा पदाधिकारी तसेच महानगर पालिकेचे अधिकारी आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, संकल्प यात्रा ही प्रत्येक वार्ड मध्ये जाणार असून या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना विविध योजनेचं लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती करणे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासर्व योजने पासून कुठलाच नागरिक वंचित राहणार नाही याची कलाजी घेतली पाहिजे असे मत यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow