रखरखत्या उन्हात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी पक्ष संघटनांचा एल्गार...!
उपवर्गीकरणाच्या विरोधात रखरखत्या उन्हात आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज सोमवारी दुपारी रखरखत्या उन्हात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी 1 वाजता हमखास मैदान येथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये हजारो आंबेडकरवादी सहभागी झाले होते. डोक्यावर सूर्य आग ओकत असतानाही हातामध्ये विविध घोषणांचे फलक घेऊन निघालेल्या मोर्चेकरांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. एससी आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाची सखोल पडताळणी करावी, लवकरात लवकर जातीय जनगणना करावी, सर्व 59 अनुसूचित जातीचा स्वतंत्र अभ्यास करावा, अनुसूचित जातीचा बॅकलाॅग भरून काढावा तसेच रिक्त पदे तात्काळ भरावीत, खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करावे, न्यायाधीशांच्या नियुक्ती मध्ये आरक्षण लागू करावे, अनुसूचित जाती आरक्षणाचे मर्यादा वाढवून 20% करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालाया समोरच एक छोटेखानी सभा झाली. घाई घाईने व अपूर्ण माहितीच्या आधारावर उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विविध वक्त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला. या मोर्चामध्ये दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, ऍड रमेशभाई खंडागळे, रमेश गायकवाड, गौतम लांडगे, अमित भुईगळ, कृष्णा बनकर, बंडू कांबळे, राजू साबळे, विजय वाहुळ, राहुल साळवे, सचिन निकम, सतीश गायकवाड, पंडित बोर्डे, सुनील वाकेकर, जिल्हा परिषद सदस्या विद्या गायकवाड, विजय मगरे, लक्ष्मण हिवराळे, ऍड धनंजय बोरडे, विशाल इंगळे, मनोज वाहुळ, नाना म्हस्के, प्रवीण जाधव, मिलिंद थोरे, संतोष भिंगारे, अफसर खान, विजय बचके, बाळू वाघमारे, बलराज दाभाडे, मेघानंद जाधव, पंकज बनसोडे, जयश्री शिर्के, डॉ.दीपक खिल्लारे, प्रा.संजय वानखेडे, डॉ.अनिल पांडे, मनोज शिंदे, राहुल मकासरे, किशोर वाघ, भीमसेन कांबळे, बाळू गायकवाड, सोनू नरवडे, कपिल बनकर, विशाल रगडे, किरण मांदळे, अरुण शिरसाठ, विजय शिंदे, कुणाल खरात, कमलताई मनोरे, जयंत जावळे, नवल सूर्यवंशी, सचिन शिरसाठ, सचिन निकम, मुकुल निकाळजे, शिरीष जाधव, मचिंद्र बनकर, बाबुराव वाकेकर, नरेश पाखरे, प्रकाश नवतुरे, बाबा नरवडे, संदीप पटेकर, अनिल दाभाडे, नरेश पाखरे, विनोद बोराडे, संदीप नाथभजन, राहुल साळवे, नंदू हिवाळे, राजेश भारसाकळे, नरेश पाखरे, संतोष दिलवाले, अनु शिंदे, धनंजय रायबोले, अनिल जाधव, अनिल सावंत, शेखर निकम, बाबा दांडगे, अभिमन्यू अंभोरे, प्रथम कांबळे, नितीन साळवे, प्रशांत म्हस्के, सुरेश सोनटक्के, जवाहर भगूरे, दिनेश गवळे, रंगा भुईगळ, सुनील खरात, रवी जावळे, रतन कांबळे, बंटी सदाशिवे, ऍड जगन साळवे, कृष्णा भंडारे, लखन दांडगे, रमेश मगरे, विकी सोनुने, योगेश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
What's Your Reaction?