सर्वसाधारण सभेत वंचित एमआयएम आमने सामने...!

 0
सर्वसाधारण सभेत वंचित एमआयएम आमने सामने...!

सर्वसाधारण सभेत वंचित, एमआयएम आमने सामने... वंचितचे नगरसेवक अफसरखान यांचा माईक तोडण्याचा प्रयत्न, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी बजावले दादागिरी सहन करणार नाही, 

अर्थसंकल्पावर सदस्यांनी पाडला सूचनांचा पाऊस...

निधी वाटपात भेदभाव केल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप... ज्या 22 नगरसेवकांविरोधात तक्रारी आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा मुद्दा सर्वसाधारण सभेत गाजला...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)-

आज अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेत एमआयएम व वंचित आमनेसामने आले‌. एमआयएमचे नगरसेवक सभागृहाची शिस्त पाळत नाही असा आरोप सत्ताधारी शिंदे सेना व भाजपच्या नगरसेवकांनी केल्यानंतर राडा बघायला मिळाला. विकासावर चर्चा न करता अन्य विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. ज्या एमआयएमच्या नगरसेवकांवर आरोप आहे त्यांच्यावर महापौरांनी कारवाई करावी‌. असा दबाव सत्ताधारी नगरसेवकांनी केला. तर वंचितचे नगरसेवक अफसरखान व विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला. एम आय एम आमच्यावर आरोप करत आहे की आम्ही भाजपसोबत मिळालेले आहे हा आरोप खोटा आहे. आम्ही भाजपाच्या विरोधात निवडणूक लढलो. वंचितचे सर्वेसर्वा एड प्रकाश आंबेडकर भाजपा विरोधात सतत आंदोलन करुन जाब विचारत आहेत‌. तर हा आरोप त्यांनी मागे घ्यावा एमआयएम भाजपाला साथ देते हे सर्वांना माहीत आहे. खोटे आरोप करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. याला उत्तर देताना विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी वंचितचा समाचार घेतला. एड प्रकाश आंबेडकर वंचितच्या नगरसेवकांवर नाराज असतील ते सभागृहात विकासाच्या मुद्द्यावर नाही तर भलत्याच विषयावर वेळ वाया घालवत आहेत‌. त्यांनी जनतेचे प्रश्न उपस्थित करावे. एमआयएमचे नगरसेवक असे बोलले तसे बोलले त्यांच्यावर कारवाई करावी. आम्ही इम्तियाज जलिल यांचे सिपाई आहे आम्ही घाबरणारे नाही प्रशासन व महापौर जी कार्यवाही करतील आम्ही सामना करण्यासाठी तयार आहोत दादागिरी सहन करणार नाही असे ते सभागृहात उत्तर देताना म्हणाले. एमआयएमचे नगरसेवक अजहर पठाण यांनी नीधी देताना भेदभाव केला जात आहे समान निधी देण्यात यावा अशी मागणी केली. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत चर्चेदरम्यान सोमवारी सदस्यांनी सूचनांचा पाऊस पाडला. आपापल्या वॉर्डातील विकासकामे सुचवित निधीची तरतूद करण्याची मागणी केली. तर निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेवकांनी केला. आम्हाला निधी देऊ नका, सभापतींनी दिलेल्या निधीत तुम्हीच विकासकामे करा, अशी मागणीही महापौरांना करण्यात आली. 

महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 21 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे सादर केला होता. अर्थसंकल्पाची प्रत मिळालेली नसल्याने अभ्यासासाठी वेळ देण्याची मागणी सदस्यांकडून झाल्याने, महापौरांनी तहकूब केलेली सभा सोमवारी घेण्यात आली. माजी महापौर तथा नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी साइड ड्रेनेज व्यवस्था, ओपन स्पेस आदींबाबत तरतूद करण्याची मागणी केली. नगरसेवक राजू वैद्य यांनी मनपाचे उत्पन्न व खर्च यावर प्रकाश टाकला. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना सुविधा देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मनपाच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी विविध सूचना केल्या. नगरसेवक सुनील जगताप शहरातील गुन्हेगारी घटनाकडे लक्ष वेधत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. अमित भुईगळ, जालिंदर शेंडगे यांनी शहरातील दलीत वसाहतींमधील नागरिकांना सुविधा देण्यासाठी जास्त निधी देण्याची मागणी केली. शिल्पाराणी वाडकर यांनी महिला स्वच्छतागृहासाठी 8 कोटींची तरतूद करावी अशी मागणी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण केले. तेव्हापासून सत्ताही मिळाली आहे., अशी आठवणही शिवसेना उबाठाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी करून दिली. तसेच सातारा, देवळाई, पडेगाव, मिटमिटा हर्सूल याभागाचा झपाट्याने विकास होत आहे. अधिकृत लेआऊट करून गृहनिर्माण सोसायटी विकसित झाल्या आहेत. या भागाला अधिक निधी द्यावा. पडेगाव-मिटमिटा येथील स्मशानभूमींचा विकास करावा. पडेगावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व स्मृतीवनसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी गणेश लोखंडे यांनी केली.

कर वसूलीच्या अनुषंघाने अर्थसंकल्पात तरतूद करावी. प्रशासकीय खर्च वगळून पूर्ण निधी त्याच वॉर्डात खर्च करावा. कर भरणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात, त्या भागांचा विकास व्हावा., अशी मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली. अर्थसंकल्पात ज्या दुरुस्त्या सुचविल्या आहेत, शहराच्या विकासासाठी जी कामे समाविष्ट करायची, कर वसूली पाहून सर्व नगरसेवकांना निधी द्यावा, पिंपरी-चिंचवडसारखा अर्थसंकल्प करू नये, अशी सूचनाही त्यांनी मांडली. शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला आहे, आणखी निधी लागल्यास आम्ही तो आणू, अशी ग्वाही दिली. 

सभागृहाने अर्थसंकल्पावर अतिशय साधकबाधक चर्चा केली. प्रत्येक सदस्याने सूचना मांडल्या. पुढील वर्षभर या अर्थसंकल्पांच्या तरतूदीनुसार आपापल्या भागात विकास कामे करायची आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 17 आधारे आवश्यक असलेल्या गोष्टींचा अधिन राहून अर्थसंकल्पीय अंदाज आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून स्वीकृत करण्यात येईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी जाहीर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow