शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात, शहर जयभिमच्या जयघोषाणे दुमदुमले

 0
शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात, शहर जयभिमच्या जयघोषाणे दुमदुमले

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तौबा गर्दी...

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही:सर्वपक्षीय नेत्यांचा सूर 

औरंगाबाद,दि.14 (डि-24 न्यूज) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आज रविवारी सकाळी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानिमित्ताने येथेच अभिवादन अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, माजी महापौर रशीद मामू सुभाष लोमटे, इब्राहिम पठाण, द्वारकाभाऊ पाथ्रीकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीनसिंग ओबेराय, शिरीष बोराळकर, अनिल मकरीये, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे या संविधानानुसारच लोकशाही मार्गाने देत चालतो बाबासाहेबांनी संविधान दिले नसते तर देशाची वाताहत झाली असती म्हणून या संविधानाचे रक्षण करणे हे तुमची व आमची जबाबदारी आहे. संविधान बदलण्याची भाषा केली जाते परंतु त्यात अजिबात तथ्य नाही संविधान कोणीही बदलू शकत नाही असे प्रतिपादन सर्वच व्यक्तींनी यावेळी केले. अभिवादन सभेचे सूत्रसंचालन सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केले. प्रारंभी शेख शफी यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी समितीचे ज्येष्ठ सदस्य निकम गुरुजी, अरविंद अवचरमल, संजय ठोकळ, विना खरे, एस.डी. मगरे, लक्ष्मण हिवराळे, विजय शिंदे, सिद्धार्थ कोतकर, प्रा. अविनाश जोगदंड, शिवाजी कवडे, विजय कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. 

शनिवारी मध्यरात्री केक कापून फटाक्याची आतिषबाजी...

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता भडकल गेट येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर 51 किलोचा केक कापून फटाक्याची जोरदार आतिशबाजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेट येथे विविध पक्ष संघटनासह सेवाभावी संस्थानी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. दरम्यान विविध सेवाभावी संस्थांनी अभिवादनसाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांना नाश्ता, शितपेय, पाणी बाॅटलचे वाटप केले तसेच काहींनी अन्नदान केले. 

सर्वपक्षिय जयंती उत्सव समितीच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन मंचावर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सर्वपक्षिय जयंती उत्सव समितीचे प्रमूख मार्गदर्शक........उपस्थित होते. जिल्हा वकील संघाच्यवतीने दुचाकी वाहनफेरी काढण्यात आली होती. उघड्या जीपमध्ये निळा फेटा बांधून निळे ध्वज हातात घेवून जयभीमच्या नारा लावत सहभागी झाल्या होत्या. या जीपमागे दुचाकीवर स्वार अनेक तरुण तरुणी निळे झेंडे फडकावताना दिसत होते. 

अभिवादन करण्यासाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डा. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, संदीपना भुमरे, संजय शिरसाट, सतीष चव्हण, अफसरखान, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, जयंती उत्सव महासंघाचे रतनकुमार पंडागळे, मनसेचे सुमित खांबेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे उपस्थित होते. 

समता सैनिक दलाचे पथसंचलन...

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्यावतीने मिल काॅर्नर येथून रॅली काढण्यात आली होती. समता सैनिक दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. मिल काॅर्नर येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या रॅलीची सुरुवात करण्यात आली. पथसंचलन करत ही रॅली भडकल गेट येथे दाखल झाली. यावेळी समता सैनिक दलाच्या जवानांनी बॅंड पथकांच्या तालावर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

परिसरात पुस्तकांची, बुद्ध व बाबासाहेबांच्या मुर्ती, निळे बॅच, बिल्ले विक्रेत्यांची दुकाने थांटली होती. पुस्तकांच्या स्टाॅलवर आंबेडकरी अनुयायी पुस्तके घेताना दिसत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जोर से बोलो जयभीम अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता. डाॅ बाबासाहेब आंबेडरांच्या पुतळ्यापुढे मेनबत्त्या पेटवून व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

पाणी व अन्नदान

भडकल गेट येथील म्हस्के परिवाराच्यावतीने दर वर्षीप्रमाणे नाश्त्याची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ५० किलो पोहेर आणि पिण्याच्या पाण्याच्या २०० जारचे वाटप करण्यात आले. निवृत्ती म्हस्के यांनी १९७२ पासून या ठिकाणी नाश्त्यांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली, त्यांचा वारसा आता त्यांची चौथी पिढी चालवत आहे.

स्वातंत्र सेनानी भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्यावतीने २५ किलो शिरा आणि पाण्याच्या ५०० बाटल्यांचे वाटप करण्यात आले. विशाल मगरे व मित्र मंडळांच्यावतीने एक हजार प्लेट पोहे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे हे दूसरे वर्ष होते. श्री संगम नवयुवक क्रीडा मंडळ नारळीबागच्यावतीने यंदा पहिल्यांदाच थंडाई मठ्ठा वाटप करण्यात आले. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सिध्दार्थ मोकळे, अफसरखान, योगेश बन, प्रभाकर बकले, जलिस अहेमद, मतीन पटेल व कार्यकर्त्यांनी भडकलगेट येथे पुतळ्याला पुष्पहार अर्प

ण करून अभिवादन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow