शुक्रवारी दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार...!

 0
शुक्रवारी दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार...!

शुक्रवारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी, दि. 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांसह निकालाची प्रत डाउनलोड करता येणार असून डिजीलॉकर अ‍ॅपमध्येही डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी मंडळाने पुढील संकेतस्थळे जाहीर केली आहेत –

results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, sscresult.mkcl.org, results.targetpublications.org, results.navneet.com तसेच tv9marathi.com आणि इंडियन एक्सप्रेसच्या शिक्षण पोर्टलवरही निकाल उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जाहिर प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow