अंबादास दानवेंनी घेतली आत्महत्या केलेल्या महीला डॉक्टरच्या कुटुंबाची भेट...
शिवसेना नेते अंबादास दानवेंनी घेतली आत्महत्या केलेल्या महीला डॉक्टरच्या कुटुंबाची घेतली भेट...
बीड, दि.2(डि-24 न्यूज)-राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महीला डॉक्टर यांनी राजकिय आणि पोलिस दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याने आज बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील त्यांच्या मूळ गाव कवडगाव येथे जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
सदरील आत्महत्या ही आत्महत्या नव्हे तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या जाचाला कंटाळून हत्या झालेली आहे. या डॉक्टर ताईवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव निर्माण करून सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी तिला विवश आत्महत्या करायला भाग पाडले. या ताईला न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षासह स्वतः मी वैयक्तिक रीत्या तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी दानवे यांनी कुटुंबीयांना दिला.
डॉक्टर महीला यांचे व्यवस्थेशी लढताना बलिदान गेले आहे. शिवसेनेची त्यांना न्याय मिळावा हीच भूमिका असून घडलेली घटना अत्यंत निर्दयी आहे. राज्य सरकारने एसआयटी गठित केली असली तरीही पीडितेला न्याय मिळेल अशी शक्यता खूपच कमी वाटते. पोलीस, आरोग्य आणि स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे या आत्महत्येस जबाबदार असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडे केली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उल्हास गिराम, माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, बाळासाहेब सानप, जिल्हा संघटक नितीन धांडे व तालुकाप्रमुख विनायक मुळे उपस्थित होते.
What's Your Reaction?