अखेर काँग्रेसला मिळाला नवीन जिल्हाध्यक्ष, किरण पाटील डोणगांवकरांवर विश्वास...

अखेर काँग्रेसला मिळाला नवीन जिल्हाध्यक्ष, किरण पाटील डोणगांवकरांवर विश्वास...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) -
अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काँग्रेसला नवीन जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. तरुण व तडफदार आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले किरण पाटील डोणगांवकर यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पक्ष नेतृत्वाने दिली आहे. आता नवीन शहराध्यक्ष कोण याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्ष पद द्यावे लागेल याची प्रतिक्षा आहे. जिल्हाध्यक्ष डाॅ.कल्याण काळे जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक विजयी झाले तेव्हापासून कामाचा व्याप वाढल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळ देता आले नसल्याने पक्ष संघटन कमकुवत झाले होते. आता काँग्रेसला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळाल्याने पक्षाला संजीवनी मिळेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. आज काँग्रेस आलाकमानने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या त्यामध्ये किरण पाटील डोणगांवकर या युवा नेतृत्वाला जवाबदारी दिली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






