अतिक्रमणमुक्त रस्त्यांसाठी आमदार संजय केनेकर यांची 500 कोटींची मागणी...!

 0
अतिक्रमणमुक्त रस्त्यांसाठी आमदार संजय केनेकर यांची 500 कोटींची मागणी...!

अतिक्रमणमुक्त रस्त्यांसाठी आमदार संजय केनेकर यांची 500 कोटींची मागणी...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) -

शहरात मुख्य रस्त्यावर मोठी अतिक्रमण हटावो मोहीम महापालिकेच्या वतीने हाती घेतलेली आहे. विधानपरिषद सदस्य संजय केनेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेवून शहराच्या विकासावर सकारात्मक चर्चा करुन अतिक्रमणमुक्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी 500 कोटींची मागणी केली आहे.

शहरातील संजयनगर, मुकुंदवाडी, पैठण रोड, दिल्लीगेट ते हर्सुल टि पाॅईंट, आंबेडकर चौक अशा प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. हे रस्ते पक्के बणवण्यासाठी 500 कोटींचा निधी महापालिकेला देण्यासाठी केनेकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या रस्त्याचे कामे झाल्यानंतर या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुटेल. शहरात अपघातांचे प्रमाण कमी होईल व उद्योग व्यवसायासाठी पोषक असा सर्वांगिण विकासाला चालना मिळेल असे पत्रात म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow