अतिक्रमण कारवाई मध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 0
अतिक्रमण कारवाई मध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अतिक्रमण कारवाई मध्ये अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) रस्त्यावरील अतिक्रमण काढताना इमारत निरीक्षक यांना धक्काबुक्की व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 महानगरपालिका अतिक्रमण हटवा विभाग मार्फत सध्या शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व रस्ता बाधित व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या अतिक्रमण धारका विरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 9 मे रोजी सायंकाळी नऊ वाजता अतिक्रमण विभागाचे कंत्राटी अतिक्रमण निरीक्षक रवींद्र देसाई हे गस्त घालत असताना बजरंग चौक येथील वाहतूक अडथळा करणाऱ्या विरुद्ध अतिक्रमांची कारवाई करत होते. त्याच दरम्यान एका पाणीपुरीची गाडी जप्त करण्याच्या प्रयत्न करीत असताना त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता येऊन तुम्ही खूप दादागिरी करत आहेत गरिबांना त्रास देत आहे हे अतिक्रमण काढू नका असं बोलून त्याने देसाई यांचा शर्ट धरला व बाजूला केला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला व ती हातगाडी बाजूला लोटून घेतली. सबंधित व्यक्ती सोबत इतर दोन जण होते त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रमाणात कारवाईस विरोध केला. याबाबत इमारत निरीक्षक यांनी लगेच वरिष्ठांची परवानगी घेऊन व संबंधित पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांची मागणी केली असता पोलीस येतच सदर व्यक्ती जाय मोक्यावरून पळून गेली. परंतु अतिक्रमण निरीक्षक देसाई यांनी या गडबडीत सुध्दा त्या व्यक्तीच्या गाडीचा नंबर टिपला व याबाबत सिडको पोलीस स्टेशनमध्ये 353 इतर कलमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 महानगरपालिकेच्या वतीने सध्या नागरिकांच्या मागणीनुसार नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रथम रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरात सध्या शहागंज , सिटीचौक, गुलमंडी ,औरंगपुरा, गजानन महाराज मंदिर सह हडको टीव्ही सेंटर या रस्त्यावर कारवाई सुरूच आहे. या भागातील सुद्धा नागरिकांची मागणी होती व वेळोवेळी या भागातील या हातगाडी धारका विरोध कारवाई करणे पूर्वी त्यांना सूचनाही देण्यात आली होती व देण्यात येत आहे. महानगरपालिकेतर्फे कोणासही जाणून-बुजून किंवा दडपशाही किंवा हुकूमशाही करत नाही प्रथम त्यांना व्यवस्थित समजावून सांगून व त्यांना पूर्ण कल्पना देऊन नंतरच कारवाई प्रस्तावित करण्यात येते. शहरात सध्या अनेक ठिकाणी अनेक हातगाडी चालक अनेक वाहतूक धारक या महानगरपालिकेच्या पथकास सहकार्य करत आहे. 

परंतु काल अचानक ही घटना घडल्याने पथकास धक्काबुक्की केल्याने या लोकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने व नागरिकांच्या मागणीनुसार व प्राप्त ऑनलाईन तक्रारी , निवेदन त्या अनुषंगाने शहरातील रस्ते अडथळा मुक्त करत आहे. यामुळे अनेक नागरिकांनी मनपाच्या कामाची प्रशंसा देखील केली आहे. 

तरी शहरातील नागरिकांनी अतिक्रमण कारवाई बाबत मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow