अतिक्रमण पाडताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, फौजदारी गुन्हा दाखल करणार - डाॅ.गफार कादरी

अतिक्रमण पाडताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, महापालिका आयुक्तांविरोधात फौजदारी दाखल करणार - डाॅ.गफार कादरी
बेकायदेशीरपणे पाडापाडी केली जात असल्याचा डॉ. गफ्फार कादरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली पाडापाडी करत आहेत. जी श्रीकांत यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. लवकरच संघर्ष समिती स्थापन करू. बाधित मालमत्ता झालेल्या नागरिकांना मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असेही डॉ. गफ्फार कादरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. गफ्फार कादरी यांनी न्यायाधिश बी.आर. गवई, न्यायाधिश के.व्ही.विश्वनाथ यांच्या तत्कालीन निर्णयाचा हवाला देत जी.श्रीकांत कशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने पाडापाडी करत आहे त्याबद्दल माहिती दिली.
अतिक्रमण काढताना खाजगी मालमत्ताधारकांना नोटीस न देता, सुनावणी न घेता बांधकामे पाडण्यात आली यामध्ये गरीबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पाडापाडी करताना सर्वोच्च न्यायालयाचे जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याचे पालन होताना दिसत नाही. ज्यांचे बांधकाम पाडले ज्यांची जागा चालली त्यांना मोबदला दिला पाहिजे. आयुक्त झोपेत आहेत त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आम्ही हा इशारा देत आहोत. काही माजी नगरसेवक गुंठेवारीच्या नावाने आयुक्तांचे लांगूलचालन करत आहेत. ते दलाला सारखे काम करत आहे. त्यांचेही प्रकरण आम्ही बाहेर काढू असाही इशारा डॉ. गफ्फार कादरी यांनी यावेळी दिला आहे. शहरातील बाधित नागरीकांना सोबत घेवून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी न्यायालयात आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






