अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्याची काँग्रेसची मागणी...

 0
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्याची काँग्रेसची मागणी...

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्याची काँग्रेसची मागणी...

जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, केळगाव, अंबई, पैठण तालुक्यातील अनेक गावे, कन्नड व गंगापूर तालुक्यातील गावे तसेच खुल्ताबाद तालुक्यातील सानव मांडकी, नवगाव, शेकटा, लोहेगाव, राहुलनगर ही गावे पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. अद्यापपर्यंत शासन व प्रशासनाकडून मदत पोहोचलेली नाही. लवकर पंचनामे करून सरकारने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात मागणी करण्यात आली की –

पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ निवारा व अन्नाची सोय करावी,

शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीची नुकसानभरपाई द्यावी, शासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे.

या वेळी अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनीस पटेल यांनी भावनिक शब्दांत सांगितले 

"आमच्या शेतकरी बांधवांचे घामाने उभे केलेले पीक या

पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. शेतकरी कष्ट करून आपल्या लेकरांसाठी अन्न उभे करतो, पण आज प्रश्न असा उभा आहे की हे पूरग्रस्त शेतकरी आपल्या मुलांना काय खाऊ घालणार...अशी परिस्थिती ओढवली आहे..? शासनाने या शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय द्यावा आणि तातडीची मदत पुरवावी, हीच आमची आर्त विनंती आहे."*

हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ भैय्या यांच्या सूचनेनुसार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सिल्लोड विधानसभा प्रभारी डॉ. जफर अहमद खान, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनीस पटेल, अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे महासचिव इंजि. इफ्तेखार शेख, माजी सभापती अॅड. एबालसिंग गील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल, शेख अथर, सय्यद फराज आबेदी, शाहिद खान, डॉ. सिकंदर शेख, डॉ. हाश्मी सैफुद्दीन, मोहसिन शेख, साजिद कुरेशी, नदीम सौदागर, सलमान खान, जसबीर सिंग सौदी, गौतम किसन नरवडे, मजाज खान, सय्यद युनूस, सलीम पटेल, इमरान शेख, जोस्पीच फ्रान्सिस, मॅडम शेख जुल्फेकार आदी जिल्हा व शहर अल्पसंख्यांक विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow