अत्याचाराच्या घटना विरोधात नैतिकता म्हणजे स्वतंत्रता मोहिम, जमाते इस्लामी हिंद महीला विंगची जनजागृती मोहीम
अत्याचाराच्या घटनांविरोधात नैतिकता म्हणजे स्वतंत्रता मोहिम
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 2(डि-24 न्यूज) देशभरात व राज्यात महिलांवर आणि मुलींवर वाढते अत्याचाराची घटना, लैंगिक शोषण, हिंसा आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग महिनाभर नैतिकता म्हणजे स्वतंत्रता मोहिम एक महिना राबवणार आहेत. उद्या 3 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता हज हाऊस येथे अभियानाचा शुभारंभ होणार आहे. अशी माहिती जमात-ए-इस्लामी हिंदच्या प्रदेश अभियानच्या संयोजक डॉ. खान मुबशेरा फिरदौस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला जमात-ए-इस्लामी हिंदच्या महिला विभागाच्या प्रदेश सचिव साजिदा परवीन, जनसंपर्क सचिव फ़हीमुन्निसा, सचिव शाईस्ता क़ादरी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जमात-ए-इस्लामी हिंदच्या महिला विभागाच्या प्रदेश सचिव साजिदा परवीन म्हणाल्या की, समाजातील महिलांवरील अत्याचार हे फक्त एक लक्षण आहे, त्या मोठया मानसिक रोगाचे जो आपल्या देशाच्या शांतता आणि प्रगतीला बाधित करतो. हा रोग किंवा या संकटाचे मूळ कारण म्हणजे नैतिक मुल्यांचा ऱ्हास. समाजातील नैतिक मुल्यांचा अभाव, महिलांचे बाजारीकरण, फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन, अश्लील चित्रपट, पश्चिमात्य संस्कृतीचे अंध अनुकरण, लैंगिक शोषण, अश्लीलतेचा खुला प्रसार, विवाहबाह्य संबंध, कमकुवत कुटुंबव्यवस्था, व्यभिचार, मद्य संस्कृती, अमली पदार्थांचे वाढते सेवन, गर्भपात, हत्या, आत्महत्याचे जाळे, लैंगिक रोगांचे वाढते प्रमाण, समलैंगिकता लैंगिक हिंसा व बलात्कार, खुली अश्लीलता, पोरनोग्राफी आणि अनैतिकतेचा बोलबाला इ.गंभीर समस्यांना जन्म देते. ज्यामुळे समाजातील नैतिकतेचा पाया ढासळत असल्याचे सांगितले. हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असून समाजात जनजागृती करण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, वस्त्यांमध्ये, चौकात , शासकीय कार्यालयात रैली व पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जमात- ए- इस्लामी हिंदच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
What's Your Reaction?