अत्याचार थांबत नसतील तर बांगलादेशातील हिंदू पिडितांना भारतात आश्रय द्यावा - महंत रामगिरी महाराज
अत्याचार थांबत नसतील तर बांगलादेशातील हिंदू पिडितांना भारतात आश्रय द्यावा - महंत रामगिरी महाराज
सकल हिंदू जनजागरण समितीच्या मोर्चात वक्तव्य, एका हातात संविधान आणि दुसरीकडे सर तन से जुदाचे नारे देवून जाळपोळ करायची हे कसले संविधान मानणारे... दोन प्राचिन मंदीरांवर वक्फ बोर्डाने दावा केला असल्याचा केला रामगिरी महाराज यांनी आरोप...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)
बांगलादेशात हिंदूंवरील अन्याय व अत्याचार थांबत नसतील तर तेथील पिडित हिंदू, जैन, बौद्ध, शीख धर्मियांना भारतात आश्रय द्यावा. भारत सरकारने तात्काळ अत्याचार थांबवण्यासाठी पाऊले उचलावीत. जातींमध्ये वाटले जाल तर आपलाही बांगलादेश होईल. अन्याय, अत्याचार करणारा व तो सहन करणारा दोघेही दोषी असतात. आपण अत्याचार का सहन करायचा अन्याय करणा-यांचे मनोबल तुटेल अशी कठोर शिक्षा द्यावी त्यासाठी कायद्यातही बदल करावा अशी मागणी सकल हिंदू जनजागरण समितीच्या मोर्चात भाषण करताना सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी शासनाकडे केली आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चांदणे चौकात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सुदर्शन मुनी कपाटे यांनी बांगलादेशच्या घटनेची युनोस्कोने दखल घ्यावी जशी विविध घटनांवर घेतली जात आहे. तेथील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी युनोस्कोने पुढाकार घ्यावा अशी मागणी आपल्या भाषणात सुदर्शन मुनी कपाटे यांनी केली.
व्यासपीठावर भदन्त सुदत्त बोधी, सुंदर गौरांश प्रभु, श्रीकांत जोगदंड, सागर शिंदे, मन्मथस्वामी मठाचे डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य यांची उपस्थिती होती.
आंदोलनात आमदार अतुल सावे, भाजपाचे नेते संजय केनेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, माधुरी अदवंत देशमुख यांच्यासह भाजपा, हिंदू जनजागरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महीला, तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण जगातील 193 देशातील हिंदूंनी बघितले. आंदोलनात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनस्थळी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. चोहोबाजूंनी रस्ते बंद केल्याने चार तास वाहतूक वळविण्यात आल्याने काही रस्त्यांवर ट्राफिक जाम झाली होती.
पुढे बोलताना रामगिरी महाराज यांनी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही त्यावर एक उदाहरण दिले परंतु कोणत्याही धर्माबद्दल बोललो नाही तर सर्वच धर्मात अशी लोक आहेत त्यांना कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ते तशेच वागतात. एका हातात संविधान तर दुसरीकडे सर तन से जुदाचे नारे देत जाळपोळ करायची रस्त्यावर आंदोलन करायची वृत्ती समाजात असल्याची त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सर तन से जुदा घोषणा कशाला संविधानावर आमचा विश्वास आहे असे लोक सांगतात. विश्वास आहे तर मग जाळपोळ का करायची. विश्वास ठेवा संविधानावर मग अशी क्रुरता करायची असल्यास संविधान बाजूला ठेवायचे, सोयीनुसार वापर करायचा. आपल्या गालावर कोणी मारले दुसरा गाल पुढे करायचा हेच आपल्याला शिकवले गेले मात्र हे मुर्खपणाचे विचार आहे मुळात कुणी गालात का मारावी मारली तर आपण ते सहन का करावे असाही प्रश्न रामगिरी महाराज यांनी उपस्थित केला.
धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात जे वक्तव्य केले होते ते याच उद्देशाने होते. हिंदूंवर होणा-या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो. त्यावेळी एक उदाहरण सांगितले. त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे नीच विचारांचे लोक रस्त्यावर आले. आजपर्यंत अन्याय सहन करत आलो हाच आपला दोष आहे. सनातनी थोडे जागृत झाल्याचा परिणाम 23 तारखेला दिसून आला. पूर्ण जागृत झाल्यास विश्वाची उलथापालथ करेल. अमेरिकेचा अध्यक्ष हिंदू निवडू शकतो मग हिंदूंची क्षमतेकडे महाराजांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.
कबरेची पुजेला रामगिरी
महाराज यांनी मुर्तीपुजा म्हटले...
मुर्तीपुजा करणा-यांना लोक काफिर म्हणतात कबरेची पुजाहि मुर्तीपुजाच असते असे म्हणत दुसरीकडे कब्रस्तान बनवून ताबाही घेतात. कबरेची पुजा करणे हि मुर्तीपुजाच झाली ना...? कब्रस्तानची पुजा चालते, पण मुर्तीपुजा चालत नाही. वक्फ बोर्डाने मढी येथील प्राचिनकालिन कानिफनाथ महाराजांचे मंदिर, नाशिकमधील सप्तश्रृंगी मंदीरावर दावा ठोकला यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. कोणी अन्याय करत असेल तर सरकारने कठोर निर्णय घ्यावे. सरकार निर्णय घेवू शकत नसेल तर समाजाने पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या भाषणात औरंगजेबावर टिका...
औरंगजेबाने आपल्या पित्याला जेलमध्ये टाकले तर भावाला वेदाचे ज्ञान असलेल्या त्याला राजा बनवले जाण्याचा निर्णय झाला होता अशा परिस्थितीत राजाची खुर्ची जावू नये म्हणून औरंगजेबाने आपला भाऊ दाराशिकावोला ठार मारले. असे आपल्या भाषणात महंत रामगिरी महाराज यांनी केली टिका.
बांगलादेश भुक्कड देश...
ज्या बांगलादेशाला पाकीस्तानाच्या तावडीतून भारताने सोडवले. कोरोना काळात इस्कॉन मंदीराने तेथील लोकांची भुक मिटवण्याचे काम केले त्याच मंदीराचे संतांना बंदी बनवले. अशी टिका महंत रामगिरी महाराज यांनी आप
ल्या भाषणात केली.
What's Your Reaction?