थकीत मालमत्ता करामुळे सिटीचौकात दोन दुकाने केली सिल...!
थकीत मालमत्ता करामुळे सिटीचौकात दोन दुकाने केली सिल...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) शहरात महापालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कर वसुली जोरात सुरू केली आहे. थकीत मालमत्ता धारकांची मालमत्ता सिल करत असल्याने खळबळ उडाली आहे. सिटीचौक येथील नजमोद्दीन आबेद अली व इतरांच्या दुकानाचा मालमत्ता कर 99,885 रुपये, कासारीबाजार येथील देवीचंदसा दुलीचंदसा यांच्या दुकानावर थकीत मालमत्ता कर 2,06,142 रुपये असल्याने त्यांना नोटीस दिल्यानंतर सुध्दा प्रतिसाद मिळाला नसल्याने दुकाने सिल केली आहे.
सलिम काॅम्पलेक्स, देवडीबाजार देवीदास लक्ष्मण चित्ते यांचे दुकानाचे 1,25,577 रुपये थकीत मालमत्ता कर, सिटीचौक येथील मो.अ.बशीर मो.अ.मो.माबुद मुक्तदर यांच्या दुकानाचा थकीत मालमत्ता कर 2,17,110 रुपये, सराफा येथील अखिल अहेमद यांनी आपल्या दुकानाचा थकीत मालमत्ता कर 1,13,556 धनादेशाद्वारे मनपाला भरला आहे.
वसूली पथकात झोन 1 चे कर अधिक्षक अविनाश मद्दी, लिपिक रविंद्र आदमाने, अशोक वाघमारे, अमित रगडे, बबन जाधव, मोहम्मद अन्सारी वसूली कर्मचारी विवेक जाधव, हमीद मामू यांनी हि कार्यवाही केली आहे.
What's Your Reaction?