अपात्रता सुनावणी, तारीख-पे-तारीख, 9 नगरसेवकांची आयुक्तांनी घेतली सुनावणी

 0
अपात्रता सुनावणी, तारीख-पे-तारीख, 9 नगरसेवकांची आयुक्तांनी घेतली सुनावणी

सदस्यत्व अपात्रता बाबत आज नऊ नगरसेवक, नगरसेविकांची सुनावणी संपन्न

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज)- महानगरपालिका सदस्य विरोधात दोन पेक्षा अधिक अपत्य, अतिक्रमण, अनाधिकृत बांधकाम तसेच शहागंज येथील अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात दाखल झालेले गुन्हे या बाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10 (1), 10 (1-D) नुसार सदस्यत्व अपात्रते बाबत टप्पेनिहाय सुनावण्या घेण्यात येत आहे.

यानिमित्त आज एकूण नऊ सदस्यांची सुनावणी  

आयुक्त अमोल येडगे यांनी घेतली. 

आज स. 

सदस्या श्रीमती फरजाना गुलाम रसूल (अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम), 

श्री मुंशी भिकन शेख (अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम), 

श्री पठाण मजहर (अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम), 

श्री स्वामी विश्वनाथ गुरुलिंग (अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम), 

श्री.अली मीर वाजेद (अतिक्रमण/ अनधिकृत बांधकाम), 

श्री.अशोक हिवराळे (अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम) 

श्री अब्दुल समीर

 (दोन पेक्षा अधिक आपत्य)

श्री.मुंशी भिकन शेख (दोन पेक्षा अधिक आपत्य), 

श्री पठाण मजहर (दोन पेक्षा अधिक आपत्य) यांची सुनावणी घेण्यात आली. 

तसेच 15 सप्टेंबर 2026 रोजी एकूण 11 सदस्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

सुनवणी झालेल्या सदस्यांनी मागणी केल्यानुसार त्यांना म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मिळावी अशी मागणी होती त्यानुसार त्यांना पुढील तारीख लेखी कळविण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow