महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात, व्यवसायिकांनी स्वतःहुन अतिक्रमणे काढून घ्यावी - जिल्हाधिकारी
महामार्गालगत अतिक्रमण काढण्यास सुरुवात...
व्यावसायिकांनी स्वतः हुन अतिक्रमणे काढून घ्यावीत-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 6(डि-24 न्यूज )- महामार्गालगत अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेस जिल्ह्यात सुरुवात झाली असून सोलापूर धुळे तसेच छत्रपती संभाजीनगर पैठण या मार्गालगत अतिक्रमणे काढण्यात येत आहेत.
रस्ता सुरक्षा अभियानाचा भाग म्हणून महामार्गालगत असणारी व्यावसायिक अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेस जिल्ह्यात शनिवार (दि. 5)पासून सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे सोलापूर तसेच राष्ट्रीय महामार्ग 752 छत्रपती संभाजीनगर ते पैठण लगत असणारी अतिक्रमणे काढण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 470 पक्की दुकाने व ढाबे, 255 कच्ची शेड, टपरी तसेच व्यवसायिक बोर्ड इ. साहित्य, सामुग्री हटविण्यात आली. ही मोहीम राबवितांना विहित प्रक्रिया राबविण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत.
सोमवारी सोलापूर धुळे महामार्गावर
गांधेली, सातारा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी इ. भागात मोहीम राबविली जाणार आहे.मोहीम पुढील 15 दिवस कन्नड तसेच पैठण पर्यंत सुरू राहील, असे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण विभागामार्फत सांगण्यात आले.
दरम्यान नागरिक, व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहुन काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी
केले आहे.
What's Your Reaction?