अफसरखान यांनी दिली सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार, एमआयएमला पाठिंबा दिल्याचे पोस्ट व्हायरल

 0
अफसरखान यांनी दिली सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार, एमआयएमला पाठिंबा दिल्याचे पोस्ट व्हायरल

अफसरखान यांनी दिली सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसरखान यांनी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिल्याचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अफसरखान अक्रामक झाले आहे त्यांनी उशिरा रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन संबंधितांवर फेक लेटर बनवून व्हायरल केल्याने सायबर कडून चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिस निरीक्षकांना केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती स्वतः अफसरखान यांनी डि-24 न्यूजला दिली आहे. यावेळी वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमले होते. यावेळी पक्षाचे नेते अमित भुईगळ, अरुंधती सिरसाठ यांची उपस्थिती होती. फेक लेटरची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करणार असे आश्वासन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी वंचितच्या नेत्यांना दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow