इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे यांच्या सह 37 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमध्ये बंद

 0
इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे यांच्या सह 37 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमध्ये बंद

अभूतपूर्व उत्साह, सकाळपासूनच लागल्या रांगा

महिला, नवमतदारांचा उत्साह, मुस्लिम बहुल वार्डात मतदारांचा उत्साह, पतंगाला पसंती तर खैरे आणि अफसरखान बनले वाटेकरी.... सकाळी गर्दी कमी दिसून आली तर दुपारी बारा वाजेपासून वाढली गर्दी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अंदाजे 60 टक्के मतदान झाले असल्याचे सांगितले.... यामध्ये वाढ शक्य.‌‌.. खैरे व जलिल यांचा विजयाचा दावा तर दारुस्सलाम येथे एमआयएमच्या कार्यकर्त्यांचे जश्ने इम्तियाज सुरु....

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज)17 व्या लोकसभेसाठी औरंगाबाद मतदार संघातून भावी खासदार निवडून देण्यासाठी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या जून्या शहरातील मतदारांनी दुपारी 1 वाजेपर्यंत 32.37 टक्के मतदान पूर्ण केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारत स्काऊट गाईड मतदान केंद्रावर संजय शिरोडकर व माधुरी शिरोडकर या दाम्पत्याने सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. येथे 7:30 वाजेपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. याच ठिकाणी महिला मतदान कर्मचारी, मतदार यांच्यासाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथील 6 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सर सय्यद हॉल, लोटाकारंजा, देवडीबाजार, मुलमची बाजार, अंगुरीबाग, शिशुविकास सराफा, उस्मानपुरा, गांधीनगर या संवेदनशील व गत दंगलीसाठी प्रसिद्ध मतदान केंद्रांवर तगडा सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुलमंडी शिवाजी हायस्कूल चौराहा, शिशुविहार, जिप हायस्कूल औरंगपुरा, बालज्ञान मंदिर खडकेश्वर, रेल्वेस्टेशन परिसरातील सिल्कमिल कॉलनी, सादातनगर, जालाननगर, कोकणवाडीत मतदानाचा जोर दिसून आला. कटकट गेट, नेहरुनगर, शताब्दीनगर , गणेश काॅलनी, रशिदपूरा, किराडपूरा, शरीफ काॅलनी, रहेमानिया काॅलनी, अल्तमश काॅलनी, आझाद चौक, रोशनगेट, शाहबजार, हिमायतबाग, एन-6 सिडको चिश्तिया काॅलनी, शहागंज, अंगुरीबाग, लोटा कारंजा, हर्सुल, जटवाडा रोड, सईदा काॅलनी, नवाबपूरा, सिटी चौक, जुना बाजार, आरेफ काॅलनी, बुढीलेन, भडकलगेट, टाऊनहाॅल या भागात सकाळी मंद गतीने मतदान सुरू होते तर अकरा वाजेनंतर गर्दी वाढत गेली. काही ठिकाणी संत गतीने मतदान सुरू होते. परिसरातील गोदावरी स्कूल केंद्रावर मतदानासाठी सकाळी तुरळक गर्दी व दुपारी शुकशुकाट दिसून आला. 

एमआयएमचे आता 3 खासदार.... इम्तियाज जलील यांनी सांगितले 4 जून रोजी देशातील सर्वात मोठा जल्लोष साजरा करणार असल्याचा दावा केला.

देशभरात चर्चित असलेल्या चुरशीच्या या निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी दिल्ली व मुंबई येथील चॅनल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. एमआयएमचे उमेदवार विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी या हडकोतील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क दोन मुले व पत्नीसोबत बजावला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता आमचे 3 खासदार निवडून येतील. माझा विजय 200 टक्के आहे भाजपा धर्म, जातीचे राजकारण करून विघटनवाद व जातियद्वेष पसरवत आहे. फोडाफोडीचे राजकारण करून पक्ष फोडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

दरम्यान एमआयएम युथ विंग, महाविकास आघाडीसाठी युवा सेना, काँग्रेस, एनएसयूआय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच संदिपान भुमरे यांच्यासाठी भाजयुमो, युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल कार्यकर्त्यांसह फिरत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदान केंद्रावर भेटी देऊन आढावा घेत मतदार व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, अनिस पटेल, इब्राहिम पटेल, डॉ. जफर अहेमद खान, इब्राहिम पठाण, एड अक्रम सय्यद, डॉ.पवन डोंगरे, डॉ.सरताज पठाण, इक्बालसिंग गिल, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, इलियास किरमानी, मोतीलाल जगताप, नविन ओबेरॉय, प्राचार्य शेख हे मतदान केंद्रावर व परिसरात महाविकास आघाडीसाठी परिश्रम घेत होते.

आदर्श मतदान केंद्रांवर इत्यंभूत सुविधा 

बीडबायपास येथील चाटे स्कूल तसेच एमजीएम येथील संस्कार विद्यालय येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. येथे सेल्फि पॉइंट, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर व्यवस्था, स्तनपान कक्ष, पिण्याचे पाणी, चहा अशी इत्यंभूत व्यवस्था करण्यात आली होती.

नवमतदारांचा उत्साह शिगेला 

90 व्यावर्षी रामचंद्र यांचे सातवे मतदान

लोकसभा निवडणुकीत आपला हक्काचा प्रतिनिधी संसदेत पाठविण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील 39 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. यावर्षी 80 हजार नवख्या मतदारांची भर पडली होती. यातील नोंदणी केलेल्या व मतदार यादीत नावे असलेल्या नवमतदारांचा उत्साह मतदान प्रक्रियेस गती व शक्ती देणारा ठरला. महाविद्यालयिन 18 वर्षांवरील तरुण, तरूणी यांनी ख-या अर्थाने लोकशाही सशक्त करण्याचे हे मिशन साजरे केले. मतदानाआधी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कॉलेजचे विद्यार्थी असलेले ओळखपत्र, व्होटर स्लिपसह ही तरुणाई रांगेत सज्ज होती. काहींच्या मनात आपणाला बरोबर मतदान करता येईल का.‌‌.? चुकीचे किंवा आपले मतदान बाद तर होणार नाही ना, अशी धास्ती वाटत होती, पण मतदान झाल्यानंतर या सर्व शंकांना पूर्ण विराम मिळून आपल्या हक्काचा खासदार निवडून देणार असा अभूतपूर्व उत्साह या युवाशक्तीच्या चेहऱ्यावर झळकत होता. तर 90 वर्षांचा "तरुण" मतदारही असाच सदाबहार बाण्याने शाई लावलेले बोट दाखवत होता. 

पतंगाची चर्चा, मशाल पेटली, मुस्लिम मोहल्यात खैरे यांना मतदान 

पाठिंब्याच्या व्हिडीओचाही परिणाम 

 महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना कन्नडचे माजी आमदार व याही वेळी निवडणुकीत शड्डडू ठोकलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःच्या आवाजातील कथित व्हिडीओद्वारे "मीतर काही निवडून येणार नाही, चंद्रकांत खैरे यांना मतदान करा" असे आवाहन केले होते, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सकाळी हर्षवर्धन जाधव यांनी तो बनावट व मॉर्फिंग केलेला व्हिडिओ असल्याचा खुलासा केला. पण मतदानाच्या महत्वाच्या पहिल्या सत्रात दहा वाजेपर्यंत खैरे यांच्या मताचा टक्का वाढला. शिवसेनेतील मराठ्यांसह इतर मराठा

संघटनांच्या तरूण फळीणे याच अवधीत खैरे यांच्या मताचा टक्का वाढवून घेतला. 

जलील नको ....म्हणून खैरे

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने खैरे यांना मुस्लिम बहुल भागात मोठे 10 ते 15 टक्के मतदान केल्याची चर्चा या परिसरात सुरू होती, किराडपुरा, बेगमपुरा, पडेगाव, गणेश काॅलनी, बायजीपुरा, उस्मानपुरा, नारेगाव, मिसारवाडी व दलित मुस्लिम वस्तीमध्ये ब-यापैकी मते घेण्यास वंचितचे उमेदवार अफसरखान यशस्वी झाले. अपक्ष उमेदवारांनी सुध्दा प्रचारात कसर सोडली नसल्याने त्यांनीही पक्षासारखी मते आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. एमआयएमचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या सह 37 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततेत शहरात व जिल्ह्यात मतदान झाले. आता जलील नकोच ही बाब मानणारा मुस्लीम समाजातील मोठा वर्ग त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा व शिवसेनिकांची जागोजागी फौज या बळावर खैरे यांच्या मतांचा टक्का वाढल्याचे व यास मुस्लिम मतदारांनी सक्रिय हातभार लावल्याचे धर्मनिरपेक्ष पक्षाच्या जबाबदार वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जलील यांच्या मतदानात घट होत असल्याचे दिसून आले तेव्हा एमआयएम कार्यकर्त्यांनी वंचितचे अफसर खान यांनी जलील यांना पाठिंबा दिल्याचे सांगत मतदार पतंगाकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. वंचितने इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिल्याचे फेक लेटर व्हायरल झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अफसरखान व वंचितच्या नेत्यांनी काल रात्री सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने हा संभ्रम दुर झाला. याचा मतदानावर काही परिणाम दिसून आला नाही. यावेळी महायुती, महाविकास आघाडी व एमआयएम मध्ये काट्याची टक्कर आहे. 4 जून रोजी कोण बाजी मारणार गल्लोगल्ली मतांचे गणिते बांधली जात आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले मतदारसंघात तुरळक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने बदलावे लागले. मतदान शांततेत पार पडले. काही अनुचित प्रकार घडला नाही. दहा ठिकाणी कंट्रोल युनिट बदलावे लागले. अंदाजे 60 टक्के मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. 16 ते 18 ठिकाणी सहा वाजेच्या अगोदर लाईनित असलेल्यांचे उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यामुळे टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. जेष्ठ नागरिकांना ऑटोरिक्षाने आणण्याचे नियोजन करण्यात आले होते.

आधी मतदान नंतर व्यापार 

दुकाने बंद, वाहतूकही तुरळक

 मतदानाचे कर्तव्य आद्य मानून शहरातील अनेक दुकानांचे शटर सोमवारी खाली खेचलेले होते. विशेषतः लोटाकारंजा, सिटी चौक , टिळकपथ, देवडीबाजार, रोहिलागल्ली, शहागंज, सिल्लेखाना आदी मुस्लिमबहुल भागात अनेक तास व्यापार, व्यवहार ठप्प झाले होते. रेल्वे स्टेशन, बीडबायपासवरील देवळाई चौकात बहुसंख्य दुकाने तीन वाजेपर्यंत बंद होती. काही व्यापाऱ्यांनी सायंकाळी दुकाने उघडली. सिटीचौकात काही दुकाने चालू तर काही बंद अशी परिस्थिती होती. तसेच सिटीचौक, हडको टिव्ही सेंटर, गुलमंडी ते क्रांतीचौक या वर्दळीच्या मार्गावर वाहतूक

मंदावली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow