अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्यास अजित पवार यांच्या अर्थ खात्याची कात्री, तरीही लढा सुरू राहणार

 0
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्यास अजित पवार यांच्या अर्थ खात्याची कात्री, तरीही लढा सुरू राहणार

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सारथी, बार्टीच्या धर्तीवर मार्टी स्थापन करण्यास अजितदादा पवार यांच्या वित्त विभागाची कात्री! अर्थसंकल्पात प्रस्ताव फेटाळला!

सरकारचा खरा चेहरा समोर आला... 

   मुस्लिमांचे मते मिळणार नाही तर काहीच मिळणार नाही याचा अर्थ असाच का...?

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) 

मार्टि प्रस्तावाला मंजुरी देता येणार नाही.

तसेच 'मार्टी'मुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त

भार पडणार असून याची आवश्यकता नसल्याचा शेरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने या प्रस्तावावर मारण्यात आला आहे.

 'बार्टी', 'सारथी' व 'महाज्योती' च्या धर्तीवर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी 'मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' (मार्टी) च्या स्थापनेचा पाचशे कोटी रुपयांचा मांडण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळून लावला आहे. अशा प्रकारच्या स्वतंत्र संस्थेची आवश्यकता नसून ही संस्था स्थापन केल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडणार असल्याचे कारण वित्त विभागाने दिले आहे.

अल्पसंख्याक विभागाने याच महिन्यात 'मार्टी'चा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र अशा प्रकारच्या संस्थेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट कारण सांगत विभागाच्या या प्रस्तावाला मंजुरी देता येणार नाही. तसेच 'मार्टी'मुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त

भार पडणार असून याची आवश्यकता नसल्याचा शेरा या प्रस्तावावर मारण्यात आला आहे. विविध समाज घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचे काम देखील समाधानकारक नसल्याची टिपणी यामध्ये करण्यात आली आहे.

राज्यात अनुसूचित जाती, ओबीसी आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, शैक्षणिक शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण, व्यवसायासाठी भागभांडवल, कर्जमाफीसारख्या योजना राबविल्या जातात. याचधर्तीवर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) ची स्थापना करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती.

एकिकडे... 

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्ष संस्था (टीआरटीआय), पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), पुणे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत कार्यान्वित असलेल्या अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व विभागांमार्फत राबविण्यात योजनेमध्ये आवश्यक समानता आणण्याकरीता सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येत आहे.

मुस्लिम समाजाला वेगळा न्याय का...?

अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त होईल असे वाटत होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अल्पसंख्याक मंत्री सरकारने आश्वासने दिली मार्टिची स्थापना होणार आम्हाला सरकार कडुन आशा होती. 

मुस्लिम तरुणांना मुख्य प्रवाह मध्ये आणण्यासाठी आणखी किती वाट पहावी लागणार आहे.

 अल्पसंख्यांक मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासासाठी मार्टि स्थापनेसाठी लढा चालूच राहणार अशी माहिती प्रसिध्दीपत्रकात मार्टी कृती समीतीचे अध्यक्ष एड अजहर पठाण यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow