अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाचे शहरात आयोजन...

 0
अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाचे शहरात आयोजन...

अशोक विजयादशमी व 70 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16 (डि-24 न्यूज) :- समस्त भिक्खू संघ, बुद्ध लेणी परिसर, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने अशोक विजयादशमी व 70 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात धम्मपूजा, बुद्धवंदना, धम्मदेसना तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुज्य भदंत विरूपानंदवासी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भगवान गौतम बुद्धांचा शांती, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवर, भिक्खू संघ, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळे तसेच विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे.

या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान बुद्धांच्या विचारांचा आणि धम्माच्या मानवतावादी संदेशाचा स्वीकार करावा, असे आवाहन समस्त भिक्खू संघ व बुद्ध लेणी परिसराच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी माहिती पत्रकार परिषदेत निमंत्रक पु.भिक्खु संघप्रिय(थेरो) बुध्द लेणी परिसर, स्वागत अध्यक्ष नगरसेवक डॉ.कुणाल गौतम खरात यांनी दिली.

10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत बुध्द लेणी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, माजी खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार विलास बापू भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार अब्दुल सत्तार, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, सभापती अनिल मकरिये, नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेवक जालिंदर शेंडगे, नगरसेविका प्रेमलता मिलिंद दाभाडे, नगरसेविका हर्षदा संजय शिरसाट, नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट, नगरसेवक अशोक हिवराळे, नगरसेविका विजयश्री आशिष जाधव, नगरसेविका सुनिता मनोज वाहुळ, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, नगरसेविका भारती महेंद्र सोनवणे, नगरसेवक काकासाहेब काकडे, जिवकपाल हिवराळे, दया कैलास गायकवाड, मिना नितिन खरात, सुरेखा ताराचंद गायकवाड, अनिता साळवे, चंद्रकांत हिवराळे, सिमा साळवे, विभागीय आयुक्त जी‌.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी‌. सी., पोलिस आयुक्त प्रविण पवार, मनपा आयुक्त अमोल येडगे, कुलगुरू डॉ.विजय फुलारी, पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, अनिल साबळे, रविंद्र जोगदंड, अशोक शिरसे, एस.एस.भगत, अनिलकुमार बस्ते, अशोक येरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे ‌

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow