मराठा आरक्षण उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या तोंडाला काळे फासले...!

 0
मराठा आरक्षण उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या तोंडाला काळे फासले...!

मराठा आरक्षण उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या तोंडाला काळे फासले...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.24(डि-24 न्यूज) आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना 4 जून रोजी आमरण उपोषणाला बसण्यास विरोध करणाऱ्या डॉ.रमेश तारख यांना त्यांच्या रुग्णालयात झुंझार छावाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. 

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा अशाच प्रकारे स्वागत करणार असल्याचा इशारा झुंझार छावाचे संस्थापक सुनील कोटकर यांनी दिला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयात जाऊन चर्चा केली व स्वागत केले, तारख हे मराठा समाजाविरोधात भुमिका घेत आहेत म्हणून गद्दार म्हणत तोंडाला काळे फासले. तोंडाला आलेला घास हिसकावण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा त्यांनी डॉ.तारख यांना दिला. तारख हे जरांगेंचे जवळचे सहकारी मानले जातात. मागिल 4 महीन्यात पासून ते त्यांच्या आंदोलनाला विरोध करत होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow