अश्रू धुराची नळकांडी फोडली, महिलांवर लाठीचार्ज केल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप
पतसंस्था बँक घोटाळा आंदोलनात आंसू गॅस, खासदार इम्तियाज जलील यांना आली भोवळ, आंदोलकांच्या डोळ्यात अश्रू... उशिरा रात्री विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांच्याशी मागणीबाबत खा.इम्तियाज जलिल यांची चर्चा...
तीन तास वाहतूक बंद, आंदोलकांनी रस्त्यावर ठान मांडले, खासदार इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका.... पोलिसांचा बंदोबस्त तैनात, आंदोलक घुसले विभागीय आयुक्त कार्यालयात, लेखी ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा खासदारांचा पवित्रा... सत्ताधाऱ्यांचा घोटाळेबाजांना पाठबळ असल्याचा केला आरोप....पोलिसांनी अश्रू धुराची नळकांडी फोडत महिलांवर लाठीचार्ज केल्याचा इम्तियाज जलील यांनी केला आरोप... आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयात ठाण मांडून...
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) शहरातील आठ ते दहा पतसंस्था बँक घोटाळा समोर आल्याने हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये अडकल्याने ते हवालदिल झाले आहेत. आदर्श महिला पतसंस्था घोटाळा उघड झाल्यानंतर अजिंठा अर्बन को.ऑ.बँक, मलकापूर अर्बन, यशस्विनी कृष्णाई, नवरंग आधार, राधाई, आशा इन्हवेस्टमेंट एण्ड डेव्हलोपर्स या विविध पतसंस्थेत घोटाळा उघड झाल्यानंतर ठेवीदार आर्थिक संकटात आले आहे. आदर्श घोटाळ्यातील संचालक अटक आहे तर काही फरार आहे. चेअरमन व संचालक मंडळाच्या मालमत्ता शासनाने निलामीसाठी टेंडर काढले तर त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याने ठेवीदार संतप्त झाल्याने सर्व पतसंस्थेतील हजारो गुंतवणूकदारांनी एकत्र येत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजेपासून सुरु केले. खासदार इम्तियाज जलील यांचे एक वाजेदरम्यान आगमन झाले. त्यावेळी टोपी व रुमाल घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात सरकारवर तुटून पडले. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप लावला की पतसंस्थेतील घोटाळेबाजांना सत्ताधारी वाचवत आहे. मलकापूर अर्बन बँकेचा चेअरमन संचेती हा भाजपाशी संबंधित आहे. सेवानिवृत्त पोलिस, सेनेतून सेवानिवृत्त, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक, महीला, जेष्ठ नागरिकांच्या कष्टाचे पैशांची फसवणूक झाली तरी सरकारला दयामाया येत नाही रात्री 3 वाजता अध्यादेश काढता मग यांच्यासाठी का असा निर्णय घेतला जात नाही असा प्रश्न जलिल यांनी विचारला. तर वेगवेगळ्या पतसंस्थेतील आरोपी हे विदेशात पळून गेले मग पोलिस काय करत आहे. आंदोलनाला परवानगी न देणारे पोलिस घोटाळेबाजांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेला घोटाळा कोणाच्या परवानगीने केला असा प्रश्न उपस्थित केला. जोपर्यंत पैसे मिळण्याचे ठोस लेखी पत्र विभागीय आयुक्त देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा घेत अगोदर महिलांना विभागीय आयुक्त कार्यालयात जाण्याचे खासदारांनी सांगितले. त्यांनंतर बॅरीकेट हटवत हजारो आंदोलक गेटच्या आत व बेरीकेट वरुन उड्या घेत आत प्रवेश केला. खासदार इम्तियाज जलील यांनी सुध्दा बेरीकेट वरुन उडी घेत विभागीय आयुक्त कार्यालयात प्रवेश केला. आंदोलक अक्रामक झाले. पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलिस निरीक्षक भंडारी व पोलीस कर्मचारी आत घुसले. आंदोलक अक्रामक होत असल्याने खासदारांनी भाषण सुरू करत विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा करायची सांगितले. ते येत असल्याने आंदोलक संतप्त झाले यावेळी पोलिसांनी छोटासा अश्रू गॅस सोडल्याने जमाव पांगायला लागला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांना भोवळ आली त्यांना आंदोलकांनी पाणी असलेल्या हाऊसजवळ नेत तोंड पाण्याने धुतले. यावेळी आंदोलकांच्या डोळ्यात अश्रू आले.
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जेव्हा ठेवीदारांनी आपले मत व्यक्त केले की आमच्या मदतीला खासदार जलिल धावून आले. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते आमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी समोर आले नाही किंवा आंदोलन केले नाही म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत जलिल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी केला. हिंदूत्व वादी असलो तरी मुस्लिम खासदार इम्तियाज जलील यांना मत देणार असल्याचे ठासुन सांगितले. यावेळी महीला, वृध्द, जेष्ठ नागरिक, लहान बालक आंदोलनात सहभागी झाले होते. एक महिला ठेवीदार 95 वर्षे वय असताना धरणे आंदोलनात सहभागी झाले त्या आईला उन लागत असल्याने खासदारांनी सावली केली. एक अंध गुंतवणूकदार सुध्दा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होता. बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सह सचिव देविदास तुळजापूरकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तर सुत्रसंचलन प्रांतोष वाघमारे यांनी केले.
What's Your Reaction?