शहरात विविध ठिकाणी 74 अनधिकृत नळ खंडित

 0
शहरात विविध ठिकाणी 74 अनधिकृत नळ खंडित

शहरात विविध ठिकाणी 74 अनाधिकृत नळ तोडले

औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख संतोष वाहुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा पथक प्रमुख यांच्या अधिपत्त्याखाली झोन क्रं. 1 आणि 2 च्या भागातील फिरदोस गार्डन, पडेगाव येथे 15 नळ आणि म्हाडा कॉलोनी, बाबा पेट्रोल पंप येथे 59 विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या 150 मिमी आणि 200 मिमी जलवाहिनी वरील एकूण 74 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. 

सदरील ठिकाणी अनधिकृत नळ बाबत तक्रार ह्या प्राप्त झाल्या नंतर ताबडतोब खंडित करण्यात आले.

पथकाला प्राप्त होणाऱ्या अश्या तक्रारींमुळे या सारख्या कार्यवाही चालू राहतील.

 सदरील कारवाई उप अभियंता मिलिंद भामरे,

 पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, सुमित बोराडे, अक्षय साळवी,

पथक कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, मो. शरीफ, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पूर्ण केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow