आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केली प्रतिकित्मक ईव्हिएमची होळी...!

 0
आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केली प्रतिकित्मक ईव्हिएमची  होळी...!

आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केली प्रतिकात्मक ईव्हीएमची  होळी...

EVM मशिनवर घेतलेल्या निवडणुका रद्द करुन राष्ट्रपती राजवट लावण्याची विनंती...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) EVM मशीनवर घेतलेल्या निवडणुका रद्द करून त्या मतपत्रिकेवर घ्यावेत, अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू करावी, तसेच भीमा कोरेगाव दंगलीबाबतचा चौकशी आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा, या मागणीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आज सकाळी क्रांतीचौकात प्रतिकात्मक ईव्हीएमची होळी केली.

विधानसभा निवडणुकातील आश्चर्यकारक निकालानंतर विरोधी पक्षांकडूून ईव्हीएम हटावची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आंबेडकरवादी संघटनांनीही ईव्हीएम हटावसाठी लढाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी क्रांतीचौकात प्रतिकात्मक ईव्हीएमचे दहण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भारतीय जनता पक्ष हा ईव्हीएममध्ये छेडछाड करुन सत्तेत आला. ईव्हिएममुळे दिवसा ढवळ्या मतदारांच्या मतावर दरोडा टाकण्यात आलेला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला शंभर टक्के व्हीव्हपॅट मोजणीचा अधिकार देण्यात यावा, अन्यथा मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच भीमा कोरेगाव दंगल चौकशी आयोगामध्ये न्यायधिश जे. एन. पटेल, माजी मुख्य सचिव सुमीत मलीक या आयोगाचे सदस्य आहेत. या आयोगाला आतापर्यंत 16 वेळा मुतदवाढ देवून चालढकल केली जात आहे. यात तत्कालिन मुख्यमंत्री हे सूत्रधार असल्याने अहवाल दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य रमेश गायकवाड, आंबेडकरी चळवळीचे समनव्यक विजय वाहुळ, माजी नगरसेवक रमेश जायभाये, विजय पट्टेकर, विद्याताई गायकवाड, निलुताई भोळे, प्रथम कांबळे, अभिमन्यू अंभोरे, सुनील रत्नपारखे, अनिकेत मिसाळ, संदीप वाहुळ, प्रतीक गायकवाड, संघर्ष गायकवाड, सुमेध खंडागळे, शुभम मगरे, रावसाहेब खाडे, राजू जाधव, सतीश काळे, अस्लम भाई, चंद्रकांत बनकर, देविदास खरात, सागर बागुल आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow