डॉ.रऊफ पठाण यांनी मौलाना आझाद ट्रस्टच्या अध्यपदावर दावा केल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ...!
मोठी बातमी... डॉ. रऊफ पठाण यांची मौलाना आझाद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्षपदी निवड...?
अध्यक्षपदी डॉ.रऊफ पठाण यांनी दावा केल्यानंतर वाद निर्माण झाला यानंतर दुसऱ्या बाजूने प्रसिध्दीपत्रक काढून दावा खोटा असल्याचे म्हटले व कायदेशीर मार्ग स्विकारतील असे म्हटले आहे....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) राज्यातील व शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था मौलाना आझाद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष व मौलाना आझाद शैक्षणिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून तर महंमद नवीद रोगे, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट(मुंबई), सामाजिक कार्यकर्ते इकबाल महंमद परकार(मुंबई), स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अशरफ इब्राहिम आंचलेकर एम.ए.एड.एल.एल.बी.(रत्नागिरी) यांची ट्रस्टचे ट्रस्टी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती डॉ. रऊफ पठाण यांनी आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
यानंतर त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे आम्ही अत्यंत आनंद अभिमानाने कळविले की डॉ.रऊफ सत्तार पठाण यांची मौलाना आझाद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष व मौलाना आझाद शैक्षणिक सोसायटीचे अध्यक्ष व श्री.महंमद नवीद रोगे, इकबाल मोहंमद परकार, श्री.अशरफ इब्राहिम आंजर्लेकर यांची ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक कार्यात केलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे या ट्रस्टचा का आणि नेतृत्व यामध्ये आणखी उंची मिळेल. अब्दुल अजीज मुल्ला(ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य) यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी डॉ.रफिक झकेरिया यांच्या ध्येयाची आणि कार्याची सदैव साथ दिली आहे. आज ते कामात व्यस्त असल्याने प्रेस काॅनफरन्सला उपस्थित राहु शकले नाहीत, पण त्यांनी या नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ.रफिक झकेरिया कॅम्पस हे सहनशीलता, समर्पन आणि वंचित समाजाला शैक्षणिक संधी देण्याचे एक प्रतिक आहे. कॅम्पसचे मुळ 17 व्या शतकातील एक मदरसा असताना आज ते एक महत्वपूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. कॅम्पसचे उज्वल भविष्यासाठी डॉ.रऊफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली नव्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेनंतर शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. डॉ.रऊफ पठाण यांनी मौलाना आझाद संस्थेच्या अध्यपदावर दावा केल्यानंतर हा गोंधळ निर्माण झाला आहे यानंतर मौलाना आझाद महाविद्यालयासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुस-या बाजूने एक प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करुन हा दावा खोटा असल्याचे सांगितले जात आहे. कोण खरे कोण खोटे हा येणारा काळच ठरवेल. परंतु मौलाना आझाद सोसायटीच्या वतीने एक प्रसिद्ध पत्रक इंग्रजीत जारी करण्यात आले यामध्ये सांगितले आहे काही व्यक्ती या ट्रस्टविरुध्द खोटे, फालतू आणि दुर्भाग्यपूर्ण दावे करत आहेत. मौलाना आझाद सोसायटीचे अध्यक्ष फरहत जमाल व उपाध्यक्ष श्रीमती सुप्रीया सुळे आहे. विश्वस्त अशा निराधार दाव्यांना कठोरपणे फेटाळून लावतात. आवश्यकतेनुसार कायदेशीर मार्ग स्विकारतील. मौलाना आझाद संस्थापक दिवंगत डॉ.रफिक झकेरिया यांच्या दूरदृष्टीनुसार अल्पसंख्याक आणि समाजातील वंचित घटकांना दर्जेदार शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
What's Your Reaction?