जिल्ह्यात 3 जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
प्रतिबंधात्मक आदेश जारी
छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1971 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. दि.20 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 पर्यंत हे आदेश लागू असतील. या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्षोभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्या इ. चे प्रदर्शन करण्यास इ. कृत्य करण्यास तसेच पाच किंवा पाचापेक्षा अधिक व्यक्तिंना विनापरवानगी एकत्र येणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकारी यांना वगळण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?