आता क्रांतीचौकातच जंतरमंतर, विरोधी पक्षांची एकजूट...!

 0
आता क्रांतीचौकातच जंतरमंतर, विरोधी पक्षांची एकजूट...!

आता क्रांती चौकातच जंतर मंतर...! 

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत क्रांती चौकात आंदोलन...

डाव्या लोकशाही आघाडीने देशभरातील पोलीस दडपशाही आणि विद्यार्थी-युवकांच्या अटकेचा निषेध केला.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- आता प्रत्येक शहरात जंतर मंतर करणार असाच निर्णय झाल्याने क्रांती चौकात येथुन पुढे जंतर मंतर करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागण्यांसाठी डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने शनिवार, दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही अधिकारांच्या संरक्षणाची मागणी केली.

दिल्लीसह देशभरात होत असलेल्या कथित पोलीस दडपशाहीचा आंदोलकांनी निषेध केला. विविध आंदोलनांमध्ये विद्यार्थी आणि युवकांना अटक करण्यात आल्याच्या घटनांचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना, युवकांना आणि नागरिकांना आपली भूमिका मांडण्याचा तसेच शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे आणि बससेवा बंद केल्याचा आरोप करत आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात अडथळे निर्माण करणे म्हणजे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलकांनी म्हटले. अशा कृतींमुळे संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या प्रसंगी कॉग्रेसचे खासदार कल्याण काळे, स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड भगवान भोजने, काॅग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कीरण डोणगावकर, जगन्नाथ काळे, शहर अध्यक्ष एड सय्यद अक्रम, भाकपचे कॉम्रेड अभय टाकसाळ, लाल निशाण पक्षाचे भिमराव बनसोड, मराठवाडा शिक्षक संघाचे भाई चंद्रकांत चव्हाण, सीटूचे लक्ष्मण साक्रुडकर, एसएफआयचे अरुण मते, एआयएसएफचे अनंता कराळे, एमएसएमआरएचे श्रीकांत फोपसे, अॅड सचिन गंडले, प्रकाश पाटील, भाऊसाहेब झिरपे, डॉ. लोकेश कांबळे, समाधान बारगळ, मनिषा बल्लाळ, रखमाजी कांबळे, आरती लांडगे, एआयएसएफचे अनंता कर्हाळे , सम्यक जमधडे, लाल बावटा रिक्षाचालक युनियनचे शेख अमजद शेख पाशु, राजु हिवराळे, रफिक बक्ष, शेख एजाज, समाधान पारधे, मराठवाडा लेबर युनियन चे ऍड. सुभाष सावंगीकर, स्वराज अभियानचे साथी शेख खुर्रम व प्रा. प्रकाश शिरसाठ, तिलोत्तमा झाडे, मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow