आपला व्यवसाय वाढीसाठी सुवर्ण संधी, देश विदेशात उद्योगात भरारी

 0
आपला व्यवसाय वाढीसाठी सुवर्ण संधी, देश विदेशात उद्योगात भरारी

आपला व्यवसाय वाढीसाठी सुवर्ण संधी, देश विदेशात उद्योगात भरारी, सदस्य झाल्यास तुम्हाला देश विदेशातून मोठी ऑर्डर मिळाल्यास संस्थेला काही देण्याची गरज नाही... शहरातील उद्योग भरभराटीला येण्यासाठी प्रयत्न...

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) उद्योग क्षेत्रात अग्रगण्य Business Network International(BNI) चे सदस्य झाल्यास आपला व्यवसाय देश विदेशात विस्तारीत करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. शहरातील विविध क्षेत्रातील उद्योग करणारे व्यापारी या जगातील सर्वात मोठी यशस्वी रेफरल संस्था आहे. 

या संस्थेशी जुळल्याने शहरातील 150 सदस्यांनी आपल्या व्यवसायात 52 कोटींची उलाढाल केली आहे. आपण सदस्य बनल्यास उद्योग व व्यवसाय अपग्रेड करण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. 3500+GST सदस्य बनण्यासाठी भरुन अर्ज करावे लागेल त्यामध्ये आपल्या व्यवसायाचा उल्लेख असेल. या संस्थेचा विस्तार 80 देशांमध्ये जवळजवळ 11,133+Chapters असून 3,17,028 पेक्षा जास्त सदस्य आहेत‌. भारतात 118 शहरात 1152+Chapter असून त्यांचे 55,847 सदस्य आहेत. यामध्ये औरंगाबाद शहरात 150 सदस्य आहेत. हे सदस्य 1500 करण्याचे लक्ष आहे. स्टार्टअप उद्योगात भरारी घेण्यासाठी हि चांगली संधी आहे. व्यापार वाढीसाठी ऑनलाईन ट्रेनिंग सुध्दा दिले जाते. शहरातील एका हाॅटेलमध्ये व्यवसायासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत एक्सिक्यटीव डायरेक्टर मनोज दरख यांनी दिली आहे. यावेळी पुनीत अग्रवाल व उत्सव बाहेती उपस्थित होते. BNI चे संपर्क कार्यालय उस्मानपुरा, औरंगाबाद येथे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow