इंटरनॅशनल स्पर्धेसाठी बिडकीनचे खेळाडू जाणार हैदराबादला...!

इंटरनॅशनल स्पर्धेसाठी बिडकीनचे खेळाडू जाणार हैदराबादला...!
बिडकीन, दि.6(डि-24 न्यूज) इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ताईक्वांदो खेळाडू हैदराबाद येथे 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जाणार असल्याने गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
हि स्पर्धा एल.बी.स्टेडियम, सरोरनगर येथे होणार आहे. या स्पर्धेत गाजलेला पुष्पा-2 चे अभिनेता अलु अर्जुन, सुमन तलवारे, भानू चंदन गुरु, आमदार सुधीर रेड्डी गुरु, राम लक्ष्मण गुरु, स्पर्धेचे आयोजक पी.व्हि.श्रीरामुलू उपस्थित राहणार आहे अशी माहिती इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान यांनी दिली आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती बिडकीन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे यांनी खेळाडूंचे स्वागत करत सर्व खेळाडू गोल्ड मेडल पटकावतील व देशाला नावलौकिक मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला.
हैदराबाद येथील स्पर्धेसाठी मुआज मुसा पठाण, हुमायून हाफीज इम्रान, आर्यन किशोर राठोड, रेहान असलम अतार, अनस हाफीज फिरदौस, मुबश्शिरा हाफिज इम्रान, अर्श अनिस शेख, राजरत्न अतुल निकम हे ताईक्वांदो खेळाडू रवाना होणार आहे.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे फिरदौस पठाण, मुफ्ती शाकेर मौलाना, अजहर पटेल, मुसा पठाण, असलम अतार, पत्रकार मुबीन पठाण, शिवाजी चव्हाण, अयूब शेख आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






