"इंडियन हिस्ट्री एक्झिबिशन 2026"चे शानदार उद्घाटन, इतिहास संशोधकांसाठी भेट देण्याची सुवर्णसंधी
'इंडियन हिस्ट्री एक्झिबिशन 2026' चे शानदार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- इंडियन हिस्ट्री फोरम, औरंगाबाद चॅप्टरतर्फे आणि मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या इतिहास विभागाच्या सहकार्याने नवल टाटा स्टेडियम येथे आयोजित 'इंडियन हिस्ट्री एक्झिबिशन 2026' चे उद्घाटन मौलाना हाफिज इलियास खान फलाही आणि डॉ. मखदूम फारुकी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. सलमान मुकर्रम यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थान मौलाना हाफिज इलियास खान फलाही यांनी भूषविले. डॉ. मखदूम फारुकी, सचिव, मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी डॉ. दीगन, प्राचार्य, यशवंतराव कॉलेज ऑफ फार्मसी आणि डॉ. इम्रान रमजान, प्राचार्य, मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशन यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. शेख रमजान आणि अॅड. मोहम्मद असलम मिर्झा हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलाहुद्दीन सिद्दीकी यांनी केले.
या प्रदर्शनात भारताचा इतिहास, संस्कृती, शैक्षणिक व वैज्ञानिक वारसा तसेच देशाच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाचे ऐतिहासिक योगदान विविध प्रतिकृती, ऐतिहासिक वस्तू, प्राचीन नाणी, शैक्षणिक संस्था आणि वास्तुशिल्पांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे.
सायंकाळी नमाज-ए-मगरिबनंतर आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. दिवंगत डॉ. मोहम्मद मिर्झा खिझ्र यांचे सन्मानपत्र त्यांचे पुत्र मिर्झा फैजान यांनी, तर दिवंगत मोहम्मद अब्दुलहयी यांचे सन्मानपत्र त्यांचे पुत्र अब्दुलहादी यांनी स्वीकारले.
प्रदर्शनाच्या व्यवस्थापन समितीत लईक अहमद, आदिल मदनी, सुलेमान शाहीन, नासिर जव्हेरी, अब्दुलजव्वाद कादरी, मुदस्सर नजर, अब्दुलवहाब सदफ अफशान आणि मुजाहिद हकीम यांच्यासह इतर पुरुष व महिला स्वयंसेवक सक्रियपणे कार्यरत आहेत.
हे प्रदर्शन 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे. नागरिक, विद्यार्थी, युवक आणि कुटुंबीयांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले
आहे.
What's Your Reaction?