इज्राईल-इराण युध्दाचे भारतावर परिणाम, छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी...

 0
इज्राईल-इराण युध्दाचे भारतावर परिणाम, छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी...

छत्रपती संभाजीनगर शहरात अफवा, पेट्रोल पंपावर गर्दी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - इज्राईल-अमेरीका विरुद्ध इराण युद्ध सुरू आहे. याचा परिणाम भारतावर होत आहे. पेट्रोल पंपावर इंधनाची वाहतूक बंद होणार आहे. कच्चा तेल भारतात येण्यासाठी युद्धामुळे भारतात येण्यासाठी अडचणी येत आहे. पेट्रोल व डिझेल महाग होणार आहे. पेट्रोल पंपावर असलेला स्टाॅक संपल्यानंतर बंद होणार आहे अशी अफवा छत्रपती संभाजीनगर शहरात उडाल्याने पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली आहे. येथील वाहनधारकांशी डि-24 न्यूजने संपर्क केला त्यांनी सांगितले इंधनाचा स्टाॅक करण्यासाठी पेट्रोल पंपावर लाईन लावली आहे. शहरात अफवा उडाली पेट्रोल पंप बंद होणार आहे म्हणून येथे आलो आहे. परंतु शहरातील काही पेट्रोल पंप अगोदरच ड्राय झाले आहे. पेट्रोल पंप असोसिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने इंधनाची टंचाई निर्माण होणार याची माहिती आतापर्यंत आलेली नाही परंतू उशीरा रात्री पेट्रोल पंपावर गर्दी वाढत असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे. पेट्रोल पंप डिलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करु नये, अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल पंप बंद राहणार नाही. इंधनाचा स्टाॅक उपलब्ध आहे. आज रंगपंचमी सण असल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद होते. यामुळे गर्दी वाढत आहे. युद्धामुळे इंधनावर परिणाम होणार तरीही गाडीमध्ये इंधन भरुन ठेवावे असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow