इम्तियाज जलिल यांच्या व्यासपिठावर दलित नेत्यांची उपस्थिती...
 
                                इम्तियाज जलिल यांच्या व्यासपिठावर दलित नेत्यांची उपस्थिती...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)-
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या हस्ते शाहबाजार वार्डातील दलित वस्तिमध्ये एमआयएमच्या माजी नगरसेविका सरवत बेगम आरेफ हुसेनी यांच्या प्रयत्नाने सभागृह बांधण्यात आले त्याचे उद्घाटन इम्तियाज जलिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमआयएमच्या व्यासपिठावर दलित नेत्यांची उपस्थिती दिसून आली. यावेळी माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, पँथर नेते रमेशभाई खंडागळे, कामगार नेते गौतम खरात यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. दलित मुस्लिमांची एकजूट दाखवत आपल्या परिसराचा विकास करावा असा संदेश यावेळी त्यांनी दिला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. शहरात इम्तियाज जलिल यांच्या अटकेसाठी मोर्चा काढला गेला परंतु त्या मोर्चात हे नेते दिसून आले नाही. परंतु हे नेते एमआयएमच्या कार्यक्रमात आल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            