इम्तियाज जलील यांनी मानले मतदारांचे आभार, विरोधकांवर बरसले
इम्तियाज जलील यांनी मानले मतदारांचे आभार, विरोधकांवर बरसले
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज), पराभवानंतर इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्व मतदारांचे आभार मानले ज्यांनी जात पात न बघता औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमला मतदान केले.
त्यांनी याप्रसंगी त्यांच्या निवासस्थानासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले हिंमत हारायची नाही पुन्हा लढत राहणार मजबुतीने जनतेची सेवा करत राहणार. परंतु ज्या विरोधकांनी दोन्ही जागेवर उभे राहून एमआयएमच्या इत्तेहादला ठेच पोहचवण्याची चुक केली त्यांना समाज माफ करणार नाही. जे उमेदवार मला पाडण्यासाठी रिंगणात उभे होते त्यांना समाज धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. निवडणूक येते आणि जाते कोणी हारतो कोणी जिंकतो परंतु आम्हाला याच समाजात वावरायचे आहे. काही लोकांनी राजकारणाला धंदा बनवला यांना ओळखण्याची गरज आहे. ज्या महीला, बालक व जेष्ठ नागरिकांनी आम्हाला विजय मिळावा यासाठी अल्लाहकडे दुवा केली. त्यांचेही आभार मानतो. ज्यांनी आपली मते विकली नाही एकजुटीने मते केली. त्यांचेही आभार मानतो. अशीच एकता आपल्याला भविष्यात दाखवायची आहे. तोच आत्मविश्वास निर्माण करायचे आहे खचून न जाता पुढील वाटचाल सुरू ठेवायची आहे. या निवडणुकीत दोन गुन्हे दाखल करण्यात आले मी हिंमत हारणार नाही तर लढत राहणार. पक्षाचे सुप्रीमो असदोद्दीन ओवेसी व पक्षाचे नेते अकबरोद्दीन ओवेसी यांच्या वतीने सर्व नागरिकांचे आभार मानतो. लवकरच ओवेसी शहरातील नागरिकांचे आभार माणण्यासाठी येणार आहे असे त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासेरोद्दीन सिद्दीकी यांनीही मतदारांचे आभार मानले.
What's Your Reaction?