उद्या आंतरवाली सराटी येथे होणार ऐतिहासिक जाहीर सभा, जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष, पर्यायी मार्गाचा वापर करावा

 0
उद्या आंतरवाली सराटी येथे होणार ऐतिहासिक जाहीर सभा, जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष, पर्यायी मार्गाचा वापर करावा

उद्या आंतरवाली सराटी येथे लाखोंचा जनसागर उसळणार, पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला विविध राज्यांतील सकल मराठा समाजातील लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील हे आंदोलन करुन विविध शहरांत जाहीर सभा घेऊन आपली भुमिका स्पष्ट करत आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळावे अशी त्यांची मागणी आहे. शासनाने आरक्षणासाठी समिती स्थापन करुन मराठवाड्यात समितीचा दौरा सुरू आहे. 

उद्या होणाऱ्या या जाहीर सभेसाठी येणाऱ्या अन्य वाहनांना वाहतूकीसाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. सराटे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हि जाहीर सभा धुळे सोलापूर महामार्गावरील रामगव्हाण रोडवरील शंभर एकरवर होत आहे. 30 ते 35 हजार वाहने या रस्त्यावर उद्या सकाळी 8 वाजेपासून येण्यास सुरुवात होणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्ग बीड-पाडळसिंगी-मादळमोही-खरवंडी-पाथर्डी-शेवगांव-पैठण-औरंगाबाद

किंवा

बीड-पाडळसिंगी-खरवेडी-पैठण-औरंगाबाद या मार्गाचा अवलंब करावा.

वापरात असलेला मार्ग...

बीड-गेवराई-औरंगाबाद

बीड-गेवराई-जालना असेल.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत येणाऱ्या मराठा सकल समाजाच्या लोकांना आवाहन केले आहे सभास्थळी जाताना शांततेत प्रवास करावा, आपल्या वाहनांमुळे कोणाला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करु नये. रस्त्यावरील काही पेट्रोलपंप बंद असण्याची शक्यता असल्याने आपल्या शहरातूनच गाडीत इंधन व पिण्याचे पाणी व आवश्यक अन्न सुरक्षित ठेवावे. आपल्या कुटुंबाची प्रवासात व सभास्थळी काळजी स्वतः घ्यावी. गाड्यांचे पार्कींगसाठी 300 एकरची व्यवस्था केली आहे. पाणी व जेवणाची 130 गावांनी सोय केली आहे. 20 हजार स्वयंसेवक सेवेत कार्यरत आहेत. सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे. कोणाची चारचाकी गाडी खराब झाल्यास दहा क्रेन व मेकानिकची व्यवस्था केली आहे. 70 एम्बूलन्स, 9 फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात करण्यात आले आहे. बंदोबस्तात पोलिस तैनात करण्यात आले आहे त्यांना सहकार्य करावे. असे आवाहन समाजाला पत्रकार परिषदेत विजय काकडे यांनी केले आहे.

यावेळी अरुण नवले, जी.के.गोदाम, गणेश डगळे, गोरख यादव, परमेश्वर नलावडे, गमे पाटील, सचिन सरकटे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow