उद्या जिल्हा कारागृहात धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने वैद्यकीय उपकरणांचे वाटप व शिबीर

 0
उद्या जिल्हा कारागृहात धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने वैद्यकीय उपकरणांचे वाटप व शिबीर

श्रीगणेशा आरोग्याचा 2026

उद्या जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे

मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 18 (डि-24 न्यूज)- येथील धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने जिल्हा कारागृहातील बंदीजनांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. बंदीजनांच्या विविध आरोग्य चाचण्यांसाठी लागणारे वैद्यकीय उपकरणे शनिवार दि.19 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा कारागृहाला दान करण्यात येणार आहे. यानिमित्त बंदीजनांसाठी कर्करोग निदान शिबिरही आयोजीत करण्यात आले आहे.

 मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे हा कार्यक्रम होणार असून खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. धर्मादाय सह आयुक्त नितीन जाधव, धर्मादाय उपायुक्त उषा चव्हाण-पाटील, सहा. धर्मादाय आयुक्त प्रभू कापडे, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत वरुडीकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महात्मा गांधी मिशन रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, एम.आय.टी. रुग्णालय, एम.एम.आर.आय. कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद चिकलठाणा लायन्स आय हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, बी.एस.पी. मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, इंडीयन मेडीकल असोसिएशन या संस्थांनी या उपक्रमात सहयोग दिला आहे. हृदयरोग तपासणी, कर्करोग निदान, कान नाक घसा आणि डोळे तपासणी, महिलां करीता कॅन्सर विस्हयक पॅप स्मीअर तपासणी, मूळव्याध, त्वचारोग तपासणी, डोळ्यांकरीता मोतीबिंदू तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी, सी.पी.आर. प्रात्यक्षीक आणि प्रशिक्षण आदी कार्यक्रम व उपक्रम यावेळी होणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow