उद्या बारावीचा निकाल या वेबसाईटवर ऑनलाईन बघता येईल
 
                                 
उद्या बारावीचा निकाल या वेबसाईटवर ऑनलाईन बघता येईल
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आली आहे. उद्या दुपारी बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता जाहीर होणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी हे परिपत्रक काढले आहे.
दहावी बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यातून एकूण 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी, 749911 विद्यार्थीनी, 56 तृतीय पंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर दहावीच्या परीक्षेत 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
उद्या बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना बघता येईल.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
result.gov.in
hscresult.mkcl.org
result.digilocker.gov.in या वेबसाईटवर दुपारी एक वाजता ऑनलाईन बघता येईल.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            