उद्या शरद पवार महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरात
 
                                चंद्रकांत खैरे व कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्या शहरात
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी उद्या दिनांक 20/4/2024 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एकत्रीत महत्त्वाची बैठक श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूर मिया दर्गा,उस्मानपुरा परिसर येथे घेणार असून लोकसभा निवडणूक 2024 बाबतीत सर्वांना महत्वाचे मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व आजी, माजी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती की, कृपया आपले कार्यकर्ते तसेच समर्थक यांचे सह वेळेवर उपस्थीत रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष पांडूरंग पाटील तांगडे,
जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, शहराध्यक्ष खाजा शरफुद्दिन मुल्ला,
शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, महीला आघाडीच्या शहराध्यक्ष मेहराज इसाक पटेल, राष्ट्रवादी अल्वपसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मो.ताहेर यांच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            