शहरात झळकले बॅनर, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवाभाऊ...!
शहरात झळकले बॅनर, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवाभाऊ...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) शहरात जनतेतील मुख्यमंत्री देवाभाऊ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळत आहे. केंद्रीय नेतृत्वाने आतापर्यंत महायुतीचे मुख्यमंत्री कोण हे जाहिर केले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असे शिंदेसेनेचे आमदार व कार्यकर्त्यांना वाटत आहे. सत्ताधारी आमदारांच्या बैठकीनंतर काय निर्णय होईल व दिल्लीतून मुख्यमंत्री कोण हे केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होईल.
What's Your Reaction?