2024 लोकसभा निवडणुकीत 340 खासदार निवडून येतील - गिरीश महाजन
2024 लोकसभा निवडणुकीत 340 खासदार निवडून येतील - गिरीश महाजन
ईव्हीएम वर टिका करणाऱ्यांना दिले उत्तर...
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) आगामी लोकसभा निवडणुक-2024 मध्ये भाजपाचे 340 ते 350 खासदार निवडून येतील. तीन विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाच्या निकालाने वाचाळविरांना चपराक बसली आहे. राहुल गांधी हे देशाची पनोती आहे अशी घणाघाती टीका मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, दिपक ढाकणे, हर्षवर्धन कराड उपस्थित होते.
निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यातील जनतेने मोदींच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब केल्याने तीनही राज्यात बहुमताची सरकार निवडून आली आहे.
तेलंगणा राज्यात पक्षाचे संघटन व कामही नसल्याने तेथे यश मिळाले नाही. ईव्हीएमवर शंका घेणा-यांवर त्यांनी टिका करताना नाचता येत नाही तर अंगन तेडे म्हणाले. तेलंगणा राज्याच्या निकालावर का शंका घेत नाही असेही ते म्हणाले.
2019 लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांचे 18 खासदार निवडून आले होते त्यावेळी भाजपा सोबत होती. विधानसभेत 55 आमदार निवडून आले होते आता ठाकरे गटाने एक तरी खासदार निवडून दाखवावे असे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. यंदा भाजपा लोकसभा निवडणुकी अगोदरच्या परीक्षेत पास झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुध्दा महायुतीचे बहुमताचे सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला. या निकालाने पनोती कोण हे सिद्ध झाले आहे अशी टिका काँग्रेसवर महाजन यांनी केली आहे.
What's Your Reaction?