डॉ. शरदकुमार दिक्षित यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर 13 ते 17 डिसेंबर पर्यंत
डॉ. शरदकुमार दिक्षित यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर 13 ते 17 डिसेंबर
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मिशन(एमजीएम) आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अॅड केमिस्ट असोशिएशन यांच्या सहकार्याने पद्मश्री डॉ.शरदकुमार दिक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित 47 व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला बुधवारपासून, 13 डिसेंबर प्रारंभ होत आहे. हे शिबिर 17 डिसेंबर पर्यंत चालेल. या शिबिरात अमेरिकेतील प्रख्यात सर्जन डॉ.राज लाला, डॉ.ललित लाला, डॉ.अमित बसन्नवआर हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील. 13 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता लायन्स आय हॉस्पिटल, एन-1, सिडको, राधाकृष्ण मंदिराजवळ, औरंगाबाद येथे होणार आहे. गरजू रुग्णांना सर्जरी, औषधी, जेवन मोफत देण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.उज्वला दहिफळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पुढे त्यांनी सांगितले आय हॉस्पिटल येथे रुग्णांची तपासणी होईल. या ठिकाणी शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची निवड करुन त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख तसेच वेळ दिली जाईल. गुरुवारी 14 ते रविवार 17 डिसेंबर पर्यंत एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया होतील.
गेल्या 46 वर्षात या शिबिरामधून 14 हजार 152 शस्त्रक्रिया करण्यात आले आहे यंदा 1500 रुग्णांची तपासणी आणि 500 च्या वर रुग्णांवर शस्त्रक्रिया उद्दीष्ट आयोजकांनी ठेवले आहे.
शिबिरात आवश्यक औषधांचा पुरवठा औरंगाबाद केमिस्ट अॅड असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे.
मराठवाडा, खानदेश, विदर्भातील रुग्ण शिबिरात येणार आहे.
शिबिरात दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी, चेह-यावरील व्रण, नाकावरील बाह्य विकृती असलेल्या शस्त्रक्रिया करण्यात येतील. थोड्या प्रमाणात जळालेल्या किंवा भाजलेल्या किंवा पांढरे डाग असलेल्या रुग्णांवर शिबिरात उपचार केले जाणार नाही. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना व्हावा याकरिता लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाणाचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. शिबिरातील सहभागाकरीता रुग्णांनी 9326651540, 7776044544, 9923525925, 9158778779 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?