उद्या हर्सुल ते सावंगी येथील अतिक्रमण कार्यवाई नाही...

उद्या हर्सुल ते सावगी येथील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई नाही
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.13 (डि-24 न्यूज)-
दिनांक 3 जून पासून महानगरपालिकेतर्फे रस्ता रुंदीकरण मोहीमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे.
आता डीपी रस्त्यांचे लगत सामासिक अंतरामध्ये जे मालमत्ता आहेत त्यांचे कागदपत्रे महापालिकेचे पथक तपासणार आहे. या कागदपत्रांमध्ये बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण दाखला आणि मालमत्ता कर भरणा या बाबींचा परामुख्याने समावेश राहील.
यामुळे उद्या दि 14 जुलै सोमवार रोजी ही पथके बीड बायपास, सातारा देवळाई परिसर येथे कागदपत्रांची तपासणी करणार असून उद्या अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई होणार नाही, अशी माहिती नियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






